तुमच्या डेटाला लक्ष्य करणाऱ्या अजून 53 अ‍ॅप्सबाबतची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. हे सर्व अ‍ॅपलच्या iOS प्लॅटफॉर्मवर चालणारे अ‍ॅप्स आहेत. हे सर्व अ‍ॅप्स आयफोनच्या क्लिपबोर्डमधून डेटाची हेरगिरी करतात, अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे. Ars Technica च्या एका रिपोर्टनुसार, तलाल हज आणि टॉमी मिस्क नावाच्या दोन अभ्यासकांनी मार्चमध्ये हे अ‍ॅप्स शोधले होते, पण त्यानंतरही त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. हे अ‍ॅप बेधधडक युजर्सचा डेटा चोरी करत आहेत.

आयडी, पासवर्ड चोरी होण्याचा धोका –
रिपोर्टनुसार, या अ‍ॅप्सद्वारे युजर्सचा आयडी आणि पासवर्ड यांसारखी संवेदनशील आणि खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. हे अ‍ॅप्स फोनच्या सेव्ड क्लिपबोर्डमधून डेटाची हेरगिरी करतात, यामुळे युजर्सचा आयडी पासवर्डही चोरी होऊ शकतो. अभ्यासकांच्या अहवालानंतरही त्या अ‍ॅप्सच्या कार्यशैलीमध्ये कोणताही बदल डेव्हलपर्सकडून करण्यात आलेला नाही. रिपोर्टमध्ये ज्या अ‍ॅप्सची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये काही न्यूज अ‍ॅप्सचाही समावेश आहे.

या गेमिंग अ‍ॅप्सवर हेरगिरीचा आरोप :-

8 बॉल पूल
अमेज
बीज्वेल्ड
ब्लॉक पझल
क्लासिक बीज्वेल्ड
क्लासिक बीज्वेल्ड HD
फ्लिप द गन
फ्रूट निंजा
गोल्फमार्स्टर्स
लेटर सूप
लव निक्की
माय एमा
प्लॅनेट Vs झॉम्बी हीरोज
पूकिंग
पबजी मोबाइल
टॉम्ब ऑफ द मास्क
टॉम्ब ऑफ द मास्क: कलर
टोटल पार्टी किल
वॉटरमारबलिंग

सोशल नेटवर्किंग अ‍ॅप्सचीही तुमच्या डेटावर नजर :- 
टिकटॉक
टुटॉक
टॉक
ट्रूकॉलर
वाइबर
वीबो
जूस्क

हे अ‍ॅप्सही आहेत धोकादायक :-
10% हॅप्पियर: मेडिटेशन
5-0 रेडियो पुलिस स्कैनर
एक्यूवेदर
अली एक्सप्रेस शॉपिंग ऐप
बेड बाथ अँड बियॉन्ड
डॅज्न
होटेल.कॉम
होटेल टुनाइट
ओव्हरस्टॉक
पिगमेंट
रिकलर कलरिंग बुक टु कलर
स्काई टिकट
द वेदर नेटवर्क