बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. कंपनीने आपल्या मोबाईल सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी १५ ऑगस्टच्या निमित्ताने एक विशेष ऑफर आणली आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी कायमच वेगवेगळ्या सुविधा आणत असते. यामध्ये आता रोमिंगची सुविधा आणली आहे. यामध्ये ग्राहकांना कमी दरात कंपनीच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ही अनोखी ऑफर कंपनीने जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रीय रोमिंगवरील व्हॉईस आणि एसएमएस विशेष व्हाऊचर तसेच कॉम्बो व्हाऊचर देण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएल ही अशी पहिली कंपनी आहे जिने आपल्या ग्राहकांना १५ जून २०१५ पासून मोफत राष्ट्रीय रोमिंग दिले होते. या सुविधेमुळे विद्यार्थी, व्यावसायिक, सैन्यदलातील व्यक्ती यांना लाभ होणार असल्याचे कंपनीचे अधिकारी आर.के.मित्तल यांनी सांगितले. याआधी ग्राहकांना मोफत एसएमएस, ठराविक कॉल मोफत, कॉल दराचा कमी रेट या सुविधा उपलब्ध नव्हत्या.

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या कायमच प्रयत्नशील असतात. देशात पोस्टपेड सेवा वापरणाऱ्यांमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांचे प्रमाण मोठे आहे. आपल्या या ग्राहकांना खूश करण्याच्या दृष्टीने बीएसएनएलचा हा नवीन रोमिंग प्लॅन नक्कीच फायद्याचा ठरेल यात शंका नाही.