इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने ४ जानेवारी रोजी आपल्या नव्या सेवा शर्ती (टर्म ऑफ सर्व्हिस) जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. ८ फेब्रुवारीपासून या सेवा शर्ती लागू केल्या जाणाऱ्या होत्या. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने अंमलबजावणी पुढे ढकलली. मात्र, आता केंद्रानं व्हॉट्सअ‍ॅपच्या भारतातील सीईओंना नवीन प्राइव्हसी पॉलिसीवरून कठोर शब्दात सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअ‍ॅपचे सीईओ विल कॅथार्ट यांना पत्र पाठवलं असून, कठोर शब्दात कानउघडणी केली आहे. सर्वाधिक वापरकर्त्यांच्या आधारावर भारत जागतिक पातळीवर व्हॉट्सअ‍ॅपचे घर आहे आणि त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅप सेवेसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअ‍ॅपची प्रस्तावित सेवा आणि प्राइव्हसी पॉलिसी भारतीयांच्या आवडी आणि स्वायत्ततेबद्दल चिंताजनक आहे,” असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

आणखी वाचा- गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp वापरू नका : दिल्ली उच्च न्यायालय

प्रस्तावित बदल मागे घेण्याबरोबरच गोपनियता, वापरकर्त्यांच्या आवडीचं स्वांतत्र्य आणि माहिती याबद्दल पुनर्विचार करावा. भारतीयांचा योग्य सन्मान करायला हवा. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवा शर्ती आणि प्राइव्हसी पॉलिसीमध्ये करण्यात आलेले एकांगी बदल योग्य आणि स्वीकारले जाणार नाहीत,” असा इशारा केंद्रानं व्हॉट्सअ‍ॅपला दिला आहे.

आणखी वाचा- WhatsApp ला झटका, भारतातील टॉप फ्री अ‍ॅप बनलं Signal; काय आहे खासियत?

व्हॉट्सअ‍ॅपने नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल ‘अ‍ॅण्ड्रॉइड’ आणि ‘आयओएस’ वापरकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचा वापर यापुढेही करायचा असेल तर तुम्हाला नवीन नियम आणि अटी स्वीकारणं अनिवार्य आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर थांबवू शकता, असे दोनच पर्याय व्हॉट्सअ‍ॅपने दिले. व्हॉट्सअ‍ॅपने नवीन गोपनीयतेच्या धोरणांमध्ये फेसबुक आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांसोबत आपल्या वापरकर्त्यांची माहिती आदान-प्रदान करण्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. त्यामुळे गोपनिय माहिती सार्वजनिक होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

आणखी वाचा- समजून घ्या : WhatsApp, Telegram आणि Signal पैकी सर्वाधिक सुरक्षित अ‍ॅप कोणतं आणि का?

धोका काय?

वापरकर्ता ज्या वेगवेगळ्या यंत्रणांशी जोडलेला असेल त्याची विस्तृत माहिती सहजपणे उघड होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात अनेक शाळा, गृहनिर्माण संस्था यांची माहिती, संवाद व्हॉट्सअ‍ॅपवर असल्याने भारतातील विद्यार्थ्यांची माहिती, त्यांचे ठिकाण, शाळा अशी माहिती सहज उघड होऊ  शकते. थोडक्यात काय तर अतिशय खासगी आणि क्षुल्लक माहितीसुद्धा या नव्या धोरणामुळे उघड होऊ  शकते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India asks whatsapp to withdraw changes to privacy policy bmh
First published on: 19-01-2021 at 15:29 IST