28 September 2020

News Flash

भारताने ‘बॅन’ केलं Mi Browser अ‍ॅप , ‘शाओमी’च्या युजर्सना बसणार फटका

गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुनही हटवलं

(File Photo : Reuters)

चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi च्या स्मार्टफोन्समध्ये वापर होणाऱ्या Mi Browser Pro वर भारत सरकारने बंदी घातली आहे. चीनविरोधात सीमेवर झालेल्या संघर्षानंतर युजर्सच्या सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली जात आहे.

जून महिन्याच्या अखेरीस भारत सरकारने ५९ लोकप्रिय चिनी अ‍ॅप्स बॅन केले होते. त्यानंतर २७ जुलै रोजी सरकारने अजून ४७ चिनी अ‍ॅप्स बॅन केल्याचं वृत्त आलं होतं. त्या ४७ अ‍ॅप्सच्या यादीत शाओमीच्या Mi Brower Pro चाही समावेश आहे. यापूर्वी बॅन करण्यात आलेल्या ५९ अ‍ॅप्समध्येही शाओमीच्या Mi कम्युनिटी अ‍ॅप आणि Mi Video अ‍ॅपवर बंदी होती. त्यामुळे हे तिन्ही अ‍ॅप्स आता भारतात वापरता येणार नाही. गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुनही यांना हटवण्यात आलं आहे.

शाओमीच्या फोनमध्ये Mi Browser Pro App प्री-इंस्टॉल म्हणजे आधीपासूनच असतं, यात पोको, रेडमी आणि Mi स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. ज्यांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप प्री-इस्टॉल आहे त्यांना अजूनही याचा वापर करता येत आहे. पण थोड्याच दिवसांमध्ये अन्य चिनी अ‍ॅप्सप्रमाणे हे अ‍ॅपही ब्लॅक केलं जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅप बॅन झाल्यानंतर फोनमध्ये अ‍ॅप प्री-इंस्टॉल असूनही त्याचा वापर करता येणार नाही. तर, “शाओमी नेहमी भारतीय कायद्याचं, डेटा प्रायव्हसीच्या नियमांचं पालन करते. कोणते बदल करु शकतो यावर काम करत आहोत. सरकारच्या निर्देशांचं आम्ही पालन करु अशी प्रतिक्रिया शाओमीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, शाओमीच्या Mi Brower ला पर्याय म्हणून युजर्ससाठी गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स आणि माइक्रोसॉफ्ट एज यांच्यासारखे अनेक चांगले पर्याय आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 10:20 am

Web Title: india bans mi browser pro what it means for xiaomi phone users check details sas 89
Next Stories
1 पदवीधारकांसाठी मंदीत संधी; मोठ्या पगारावर बँकेत काम करण्याची संधी
2 VIDEO: ऑनलाइन विश्वात हरवलेल्यांची…’गोष्ट बालमनाची’
3 चिमुकल्यासाठी अमृत; स्तनपान केल्याने बाळाला होणारे फायदे
Just Now!
X