News Flash

‘या’ देशांमध्येही स्वीकारलं जातं भारतीय चलन

भारतातून मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्यानं भारतीय चलन वापरण्यात येतं.

डॉलर्सला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून मान्यता आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात व्यापार हा डॉलर्सच्या सहाय्यानं केले जातात. असे काही देश आहेत ज्या देशांमध्ये भारतीय चलन स्वीकारलं जातं. अनेक देशांमध्ये भारत मोठ्या प्रमाणात वस्तू निर्यात करत असल्यानं त्या देशांमध्ये भारतीय चलन स्वीकारलं जातं असं म्हणतात.

झिम्बाब्वे
२००९ मध्ये झिम्बाब्वेमध्ये आलेल्या महागाईमुळे त्यांच्या चलनाचं मूल्य घसरलं होतं. सध्या झिम्बाब्वेकडे स्वत:चं असं चलन नाही. त्यामुळे त्यांनी आता इतर देशाचं चलन स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. २०१४ मध्ये भारतीय चलनाला झिम्बाब्वेत कायदेशीर चलनाची मान्यता देण्यात आली. इतर देशांनी भारतीय चलनाला कायदेशील चलनाचा दर्जा दिला नाही. तरी त्या ठिकाणी भारतीय चलन स्वीकारलं जातं.

नेपाळ
भारताच्या तुलनेत नेपाळच्या चलनाची किंमत कमी आहे. त्यामुळे भारतील अनेक व्यापाऱ्यांचा नेपाळमध्ये व्यापार आहे. २०१६ मध्ये भारतात नोटबंदी करण्यात आली होती. त्यावेळी नेपाळमध्ये तब्बल ९४८ कोटी रूपयांची भारतीय चलन चलनात असल्याचं समोर आलं होतं.

भूतान
भारत आणि भूतान या दोन्ही देशांच्या चलनाची किंमत जवळपास सारखीच आहे. भूतानमध्ये भारतीय चलन सहजरित्या स्वीकारण्यात येते. भूतानच्या एकूण निर्यातीपैकी ७८ टक्के निर्यात ही भूतान भारतात करतो. नोंग्त्रुम हे भूतानचे अधिकृत चलन आहे.

बांगलादेश
भारताच्या तुलनेत बांगलादेशच्या चलनाची किंमत ही कमी आहे. सध्या भारत आणि बांगलादेशमध्ये तब्बल ६ हजार ५०० कोटी रूपयांच्या आसपास व्यवहार केला जातो. त्यामुळे बांगलादेशातही मोठ्या प्रमाणावर भारतीय चलनाचा वापर केला जातो. टका हे बांगलादेशचे अधिकृत चलन आहे.

मालदीव
भारताच्या तुलनेत मालदीवच्या चलनाची किंमत अधिक आहे. परंतु आजही मालदीवमधील काही ठिकाणी भारतीय चलन स्वीकारलं जातं. भारत आणि मालदीवमध्ये जवळपास १ हजार ५०० कोटी रूपयांचा व्यवहार केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 11:11 am

Web Title: indian currency used in defferent countries as a part of trade jud 87
Next Stories
1 ‘मारुती’चा दबदबा कायम, ‘या’ आहेत सर्वाधिक विक्री झालेल्या ‘टॉप 10’ कार
2 मोबाईलमध्ये ‘हे’ अॅप असेल तर तुमचं अकाऊंट होईल रिकामं
3 संधिवात….पथ्य अपथ्य !
Just Now!
X