Honda कंपनीने भारतीय बाजारात जानेवारी 2020 मध्ये Activa स्कूटर नवीन जनरेशनमध्ये(6G)लाँच केली. तेव्हापासून आता दुसऱ्यांदा कंपनीने या स्कूटरची किंमत वाढवली आहे. एप्रिल महिन्यात कंपनीची ही स्कूटर 552 रुपयांनी महाग झाली होती, आणि आता पुन्हा एकदा कंपनीने या स्कूटरच्या किंमतीत जवळपास 955 रुपयांची वाढ केली आहे. किंमतीत झालेल्या वाढीनंतर स्कूटरच्या स्टँडर्ड मॉडेलसाठी 65 हजार 419 रुपये (एक्स-शोरुम) मोजावे लागतील. तर, डीलक्स मॉडेलची किंमतही 66 हजार 919 रुपये (एक्स-शोरुम) झाली आहे.

आणखी वाचा – ( ‘या’ SUV ची जबरदस्त ‘क्रेझ’, बूकिंग नव्हे तर विक्रीचा आकडा तब्बल 5 लाखांपार)

आणखी वाचा – (Mahindra ने दिली ‘गुड न्यूज’! स्वस्त झाली दमदार SUV, किंमतीत घसघशीत कपात)

Activa (6G) फीचर्स :-
किंमतीशिवाय कंपनीने या स्कूटरमध्ये अन्य कोणताही बदल केलेला नाही. नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हामध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल, रिमोट सीट हॅच ओपनिंगसह मल्टी फंक्शन इग्निशन-की, एक्स्टर्नल फ्युअल फिलर कॅप, इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच आणि अन्य शानदार फीचर्सचा समावेश आहे. यामध्ये नवीन सायलेंट-स्टार्ट ACG मोटार दिली आहे. अ‍ॅक्टिव्हा 5जीच्या तुलनेत नव्या मॉडेलचं सीट लांब आहे आणि व्हिलबेस देखील अधिक आहे. नवीन स्कूटरमध्ये सस्पेन्शनही अपडेट करण्यात आले आहे. स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलेस्कोपिक आणि रिअरमध्ये 3-स्टेप अॅड्जस्टेबल सस्पेन्शन आहे.

आणखी वाचा – (Kia Sonet : टाटा नेक्सॉन-ह्युंडाई व्हेन्यूला देणार टक्कर, किती असणार किंमत?)

Activa (6G) इंजिन :-
नव्या होंडा अ‍ॅक्टिव्हामध्ये बीएस-6 मानकांसह 109cc इंजिन आहे. इंजिन अपडेट करण्याव्यतिरिक्त कंपनीने इंजिनमध्ये फ्युअल इंजेक्शन सिस्टिम दिली आहे. नवीन इंजिन 8,000 rpm वर 7.68 bhp ची पावर आणि 5,250 rpm वर 8.79 Nm पीक टॉर्क निर्माण करते. जुन्या मॉडेलपेक्षा नव्या अ‍ॅक्टिव्हामध्ये 10 टक्के अधिक मायलेज मिळेल. अ‍ॅक्टिव्हा 5जीच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्हा 6जी पावर थोडी कमी आहे, कारण अ‍ॅक्टिव्हा 5जीमध्ये दिलेलं बीएस4 इंजिन 7.96hp ची पॉवर निर्माण करतं. Honda Activa 6G देशातील सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. तर, TVS Jupiter चा दुसरा क्रमांक लागतो. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर Suzuki Access 125 ही स्कूटर आहे.

आणखी वाचा – ( ‘या’ SUV ची जबरदस्त ‘क्रेझ’, बूकिंग नव्हे तर विक्रीचा आकडा तब्बल 5 लाखांपार)