भारतातला पहिला 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. शाओमीची सब-ब्रँड कंपनी रिअलमी आपला  Realme X50 Pro  हा पहिला 5G स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच करणार आहे. कंपनी हा फोन मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC)लाँच करणार होती, पण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बार्सिलोनामध्ये होणारा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. या कार्यक्रमासंदर्भातील निमंत्रण माध्यमांना पाठवण्यात आले आहेत. फोनची लाँचिंग नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

आणखी वाचा – (किंमत फक्त…, शानदार ‘स्पोर्टी लुक’मध्ये लाँच झाली Maruti Ignis)

आणखी वाचा – ( बाप तसा बेटा ! चर्चा फक्त ज्युनियर द्रविडचीच)

दुसरीकडे, iQoo या चिनी कंपनीनेही iQoo 3 हा स्मार्टफोन लाँच करणार असून तो भारतातील 5G स्मार्टफोन असेल असा दावा केलाय. पण, हा फोन कंपनी 25 फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, रिअलमी आणि iQoo या दोन्ही कंपन्यांची पॅरेंट कंपनी BBK Electronics असून ती चिनीच आहे.

आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

रिअलमी एक्स२ प्रो मध्ये क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 सह 20 एक्स हायब्रिड झूम फीचर दिले जाण्याची शक्यता आहे. हा फोन अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल, तसेच फोनमध्ये 6 कॅमेरे असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय फोनमध्ये ६५ वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी असेल, तसेच 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत UFS 3.0 स्टोरेज असू शकतो. फोनच्या टीझरवरून यात ड्युअल सेल्फी कॅमेरा असू शकतो.

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा – (स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)

Realme कंपनीने या फोनच्या लाँचिंगबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. हा फोन भारतातील पहिला 5G स्मार्टफोन असला तरी भारतात अद्याप 5जी सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे ही सेवा कधी सुरू होणार हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे.

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

आणखी वाचा – ( बाप तसा बेटा ! चर्चा फक्त ज्युनियर द्रविडचीच)