News Flash

देशातला पहिला 5G स्मार्टफोन आज होणार लाँच, ‘इतकी’ असणार किंमत?

दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार लाइव्ह इव्हेंट

‘शाओमी’ची सब-ब्रँड कंपनी ‘रिअलमी’ आज भारतात Realme X50 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. भारतात लाँच होणारा हा पहिलाच 5G स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनी हा फोन मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC)लाँच करणार होती, पण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बार्सिलोनामध्ये होणारा हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय.

फीचर्स :  Realme X50 Pro 5G स्मार्टफोनच्या लाँचिंगआधी कंपनीने या फोनच्या काही फीचर्सबाबत माहिती दिलीये. रिअलमी एक्स2 प्रो मध्ये क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 सह 20 एक्स हायब्रिड झूम फीचर दिले जाण्याची शक्यता आहे. हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल, तसेच फोनमध्ये 6 कॅमेरे असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल मोड 5G सपोर्ट, सुपर AMOLED डिस्प्ले, 65 वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी यांसारखे प्रीमियम फीचर्स असू शकतात. तसेच 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत UFS 3.0 स्टोरेज असू शकतो. दुसरीकडे, iQoo या चिनी कंपनीनेही iQoo 3 हा स्मार्टफोन लाँच करणार असून तो भारतातील 5G स्मार्टफोन असेल असा दावा केलाय. पण, हा फोन कंपनी 25 फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, रिअलमी आणि iQoo या दोन्ही कंपन्यांची पॅरेंट कंपनी BBK Electronics असून ती चिनीच आहे.

किंमत : जगभरातील रिअलमी ग्राहकांना या फोनची झलक दिसावी यासाठी कंपनी लाँचिंग इव्हेंट लाइव्ह करणार आहे. Realme X50 Pro 5G च्या लाँचिंग इव्हेंटची सुरूवात दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास होईल. कंपनीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरुन तुम्ही हा इव्हेंट लाइव्ह पाहू शकतात. 50 हजार रुपयांच्या जवळपास Realme X50 Pro 5G या फोनची किंमत असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण, अद्याप फोनच्या किंमतीबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही. लाँचिंगवेळीच नेमकी किंमत कंपनीकडून जाहीर केली जाईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 9:23 am

Web Title: indias first 5g phone realme x50 pro 5g launch in india today know about expected price specifications and how to watch live stream sas 89
Next Stories
1 ३९ वर्ष, २ हजार ९६२ वन-डे; आजच्या दिवशी सचिनने रचला होता इतिहास
2 Ranji Trophy : …आणि सामना सुरु असताना थेट मैदानात शिरली गाय
3 VIDEO : मन हेलावणारे दृश्य; गरीब व्यक्तीनं धुवून खाल्ली चपाती!
Just Now!
X