‘शाओमी’ कंपनीने गेल्या आठवड्यातच आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनसाठी नवीन Redmi Note 10 सीरिज भारतात लाँच केली आहे. कंपनीने Redmi Note 10 सीरिजअंतर्गत तीन स्मार्टफोन लाँच केलेत. यात रेडमी नोट 10 (Redmi Note 10), रेडमी नोट 10 प्रो (Redmi Note 10 Pro) आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max) हे तीन स्मार्टफोन कंपनीने आणले आहेत. या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही फोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, शिवाय कमी किंमतीत दमदार क्वॉड रिअर कॅमेरा सेटअपही मिळतो. यातील रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा 108 MP कॅमेरा असलेला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जाणून घेऊया कसा आहे रेडमी नोट 10 प्रो मॅक्स, त्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत :-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Redmi Note 10 Pro Max की स्पेसिफिकेशन्स :-

Redmi Note 10 Pro Max मध्ये अँड्रॉयड 11 वर आधारित MIUI 12 सपोर्ट असून 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर  गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 618 GPU, 8 जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. यात क्वॉड रिअर कॅमेरा  (108 मेगापिक्सेल सॅमसंग HM2 सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल  डेफ्थ सेन्सर) सेटअप आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्येही 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. कॅमेऱ्यासोबत नाइट मोड 2.0, VLOG मोड, मॅजिक क्लोन मोड, लॉन्ग एक्स्पोजर, व्हिडिओ प्रो मोड आणि ड्युअल व्हिडिओ मोड मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS/A-GPS, (IR), USB टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची बॅटरी मिळेल, शिवाय चार्जर फोनसोबत बॉक्समध्येच मिळेल.

Redmi Note 10 Pro Max चा सेल कधी आणि किंमत काय?:-

Redmi Note 10 Pro Max च्या 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची किंमत 21 हजार 999 रुपये आहे. हा फोन डार्क नाइट, ग्लेशियर ब्लू आणि व्हिंटेज ब्राँझ अशा तीन रंगात खरेदी करता येईल.  18 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर Redmi Note 10 Pro Max हा फोन पहिल्या सेलमध्ये खरेदी करता येईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias most affordable phone with 120hz super amoled display and 108mp camera is redmi note 10 pro check price and specifications sas
First published on: 09-03-2021 at 12:33 IST