Infinix ने भारतात नवीन स्मार्टफोन Hot 7 Pro लॉंच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिझाइनसह HD+ डिस्प्ले आहे. एकूण चार कॅमेरे असलेल्या या फोनच्या पुढील आणि मागील बाजूला ड्युअल रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. भारतीय बाजारात या स्मार्टफोनची थेट टक्कर रेडमी7 आणि सॅमसंग गॅलेक्सी M20 अशा स्मार्टफोनशी होणार आहे.
9 हजार 999 रुपये इतकी इंफीनिक्स Hot 7 Pro ची किंमत आहे. हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन मिडनाइट ब्लॅक आणि अॅक्वा ब्ल्यू या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनवर एक स्पेशल ऑफर डिस्काउंट देखील आहे. 21 जूनपर्यंत हा फोन खरेदी केल्यास 1 हजार रुपयांची सवलत मिळेल अर्थात हा फोन 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
फोनमधील दुसऱ्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये 4,000 mAh क्षमतेची बॅटरी आणि AI आधारीत कॅमेरा फीचर्स आहेत. मेटल युनीबॉडी डिझाइन असलेला हा स्मार्टफोन 17 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मागील बाजूला असलेल्या ड्युअल कॅमेऱ्यांपैकी मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा आहे. पुढील बाजूलाही एवढ्याच क्षमतेचे दोन कॅमेरे आहेत.
फीचर्स –
अँड्रॉइड 9.0 पाय बेस्ड XOS 5.0
6.19 इंच HD+ डिस्प्ले
2.5D कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन
ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो P22 प्रोसेसर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2019 11:45 am