बजेट स्मार्टफोन बनवणारी कंपनी ‘इन्फिनिक्स’चा Infinix Hot 9 Pro हा स्मार्टफोन आज(दि.5) पहिल्यांदाच भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने या फोनच्या विक्रीसाठी खास सेलचं आयोजन केलं आहे. दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टवर या फोनसाठी सेलला सुरूवात होईल. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्सही आहेत.

Infinix Hot 9 Pro मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आणि होल-पंच डिस्प्ले डिझाइन आहे. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा असून भारतात 9,499 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवण्यात आलीये. हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असून फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी करणाऱ्यांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तर, अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के सवलत मिळेल. याशिवाय दर महिना 792 रुपये नो कोस्ट इएमआयचा पर्यायही आहे.

Infinix Hot 9 Pro specifications :-
इन्फिनिक्स हॉट 9 प्रोमध्ये ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असून हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित XOS 6.0 वर कार्यरत असतो. फोनमध्ये 6.6-इंचाचा एचडी+ (720×1600 पिक्सल) होल-पंच एलसीडी आयपीएस डिस्प्ले आहे. 2.0 गीगाहर्ट्ज़ हीलियो पी22 ऑक्टा-कोर प्रोसेसरसोबत 4 जीबी रॅम आहे. इंटर्नल स्टोरेज 64 जीबी असून माइक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. याशिवाय फोनमध्ये 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीही आहे. ही बॅटरी 30 तासांपर्यंत 4जी टॉकटाइम, 130 तासांचा म्युझिक प्लेबॅक, 13 तासांचा गेमिंग आणि 19 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा कंपनीचा दावा आहे. तसेच या फोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सेंसरही आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5, 3.5एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, युएसबी ओटीजी, व्हॉइस वाय-फाय आणि माइक्रो युएसबी पोर्ट आहे.