30 November 2020

News Flash

48 MP कॅमेऱ्यासह 5,000mAh ची बॅटरी, Infinix Hot 9 Pro खरेदी करण्याची संधी

मागील बाजूला चार कॅमेऱ्यांच्या सेटअपशिवाय सेल्फीसाठी 8MP क्षमतेचा कॅमेराही...

‘इन्फिनिक्स’ या बजेट स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीचा Infinix Hot 9 Pro हा स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी आहे. कंपनीने या फोनच्या विक्रीसाठी खास सेलचं आयोजन केलं आहे. दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टवर या फोनसाठी सेलला सुरूवात झाली आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सेलमध्ये Infinix Hot 9 Pro ला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळाला होता.

किंमत :-
Infinix Hot 9 Pro मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आणि होल-पंच डिस्प्ले डिझाइन आहे. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 2MP मॅक्रो कॅमरा,  2MP डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि एक लो लाइट सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP क्षमतेचा कॅमेरा दिलाय.  10 हजार 499 रुपये इतकी या फोनची फ्लिपकार्टवर किंमत ठेवण्यात आली आहे.

Infinix Hot 9 Pro फीचर्स :-
इन्फिनिक्स हॉट 9 प्रोमध्ये ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असून हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित XOS 6.0 वर कार्यरत असतो. हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा एचडी+ (720×1600 पिक्सल) होल-पंच एलसीडी आयपीएस डिस्प्ले आहे. 2.0 गीगाहर्ट्ज़ हीलियो पी22 ऑक्टा-कोर प्रोसेसरसोबत 4 जीबी रॅम आहे. इंटर्नल स्टोरेज 64 जीबी असून माइक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. याशिवाय फोनमध्ये 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीही आहे. ही बॅटरी 30 तासांपर्यंत 4जी टॉकटाइम, 130 तासांचा म्युझिक प्लेबॅक, 13 तासांचा गेमिंग आणि 19 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते, असा कंपनीचा दावा आहे. तसेच या फोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सेन्सरही आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5, 3.5एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, युएसबी ओटीजी, व्हॉइस वाय-फाय आणि माइक्रो युएसबी पोर्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 12:20 pm

Web Title: infinix hot 9 pro go on sale via flipkart check price specifications and other details sas 89
Next Stories
1 आता ‘पॉवरफुल’ रॅमसह खरेदी करा Redmi Note 9 Pro Max, किंमत किती?
2 Tata Sky ची ‘डबल धमाका’ ऑफर, ‘या’ सहा सेवांच्या किंमतीत झाली 50% कपात
3 फक्त 90 मिनिटांत सामानाची होम डिलिव्हरी, फ्लिपकार्टने आणली नवीन Flipkart Quick सर्व्हिस
Just Now!
X