इनफिनिक्स (Infinix) कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Infinix Smart 3 Plus लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला तीन रिअर कॅमेरे, फिंगरप्रिंट सेंसर आणि पुढील बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. फ्लिपकार्टवर 30 एप्रिलपासून केवळ 6 हजार 999 रुपयांमध्ये या स्मार्टफोनची विक्री सुरू होईल.

Infinix Smart 3 Plus च्या वैशिष्ट्यांबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 6.21 इंचाचा डिस्प्ले, 3,500 एमएएच क्षमतेची बॅटरी, फेस अनलॉक सपोर्ट आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये एफ/1.8 13 मेगापिक्सल सेंसर, 2 मेगापिक्सल सेंसर आणि एक लोलाइट सेंसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये एआय ब्युटीमोड आणि स्क्रीन फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. अँन्ड्रॉइड 9 पायवर आधारित एक्सओएस 5.0 वर कार्यरत असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही आहे. फोनमध्ये 3,500 एमएएचची बॅटरी असून कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटुथ, 3.5mm ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, मायक्रोयुएसबी पोर्ट यांसारखे पर्याय आहेत.

Infinix Smart 3 Plus स्पेसिफिकेशन्स

ड्युअल सिम असलेल्या इनफिनिक्स स्मार्ट 3 प्लसमध्ये 6.21 इंचाचा एचडी+ डिस्प्ले असून याचं रिझोल्युशन 720x1520 पिक्सल आणि आस्पेक्ट रेशो 19.5:9 आहे. वॉटरड्रॉप नॉच असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 2.5डी ग्लास प्रोटेक्शनचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 2 गीगाहर्ट्ज हीलियो A22 क्वाडकोर प्रोसेसरसह आयएमजी पावरवीआर जीपीयू आणि 2GB रॅम आहे. तसंच या फोनमध्ये 32GB इंटरनल स्टोरेज असून मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे.