21 September 2020

News Flash

किंमत फक्त 7,999 रुपये, ‘या’ तारखेला Infinix च्या ‘स्वस्तात मस्त’ स्मार्टफोनचा Sale

तब्बल 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 6.82 इंच स्क्रीन...

Infinix ने नुकताच भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Infinix Smart 4 Plus लाँच केला. तब्बल 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 6.82 इंच स्क्रीन असलेला हा फोन तीन कलर्सच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
अँड्रॉइड 10 आधारित XOS 6.2 वर कार्यरत असलेल्या इन्फिनिक्सच्या नवीन फोनमध्ये 6.82 इंच एचडी+ स्क्रीन असून ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए-25 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. रॅम 3 जीबी व इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे. तर, माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, 4G व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो-युएसबी यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय DTS-HD सराउंड साउंड देखील आहे. तसेच फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याती 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असून हा कॅमेरा ट्रिपल एलईडी फ्लॅश व डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. तर, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत आणि सेल कधी?:-
कंपनीने 7,999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली असून 28 जुलै रोजी फ्लिपकार्टवर या फोनच्या विक्रीसाठी पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून Infinix Smart 4 Plus हा फोन फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 2:46 pm

Web Title: infinix smart 4 plus first sale in india on 28th july get price specifications and other details sas 89
Next Stories
1 Jawa Perak च्या डिलिव्हरीसाठी अखेर सुरूवात, 10 हजारांत सुरू आहे बुकिंग
2 64MP कॅमेऱ्याचा Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची पुन्हा संधी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3 Realme च्या ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा आज भारतात पहिलाच ‘सेल’, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी
Just Now!
X