बजेट स्मार्टफोन बनवणाऱ्या Infinix कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Smart 4 Plus खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. जुलै महिन्यात लाँच झालेला हा फोन आज (दि.8) विक्रीसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. दुपारी 12 वाजता सेलला सुरूवात होईल. तब्बल 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 6.82 इंच स्क्रीन असलेला हा फोन तीन कलर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. ऑफरनुसार, सेलमध्ये ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के डिस्काउंट मिळेल. तर, ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यासही 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय दरमहा 889 रुपये नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
अँड्रॉइड 10 आधारित XOS 6.2 वर कार्यरत असलेल्या इन्फिनिक्सच्या नवीन फोनमध्ये 6.82 इंच एचडी+ स्क्रीन असून ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए-25 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. रॅम 3 जीबी व इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे. तर, माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, 4G व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो-युएसबी यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय DTS-HD सराउंड साउंड देखील आहे. तसेच फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्यातील 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असून हा कॅमेरा ट्रिपल एलईडी फ्लॅश व डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. तर, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत?:-
कंपनीने 7,999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे.