बजेट स्मार्टफोन बनवणाऱ्या Infinix ने आपला ‘Infinix Smart 5’ हा लेटेस्ट स्मार्टफोन आणला आहे. कंपनीच्या वेबसाइटवरही हा फोन उपलब्ध झाला आहे. पण अद्याप कंपनीने या फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. मात्र फीचर्सवरुन हा देखील कंपनीचा बजेट फोन असण्याची शक्यता आहे.

भारतासोबतच हा फोन नाइजेरियामध्येही उपलब्ध असेल. इन्फिनिक्स स्मार्ट 5 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा आयपीएस एलसीडीसोबत एचडी+ डिस्प्ले आहे. पॅनल आहे. 3जीबी रॅम आणि 64जीबी इंटर्नल स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन कंपनीने आणला आहे. पण यामध्ये कोणत्या प्रोसेसरचा वापर केला आङे याबाबत अद्याप माहिती नाही. पण कंपनीच्या वेबसाइटवरुन यामध्ये ऑक्टा-कोर चिपसेट असेल हे स्पष्ट झालं आहे. फोनची मेमरी माइक्रो एसडी कार्डद्वारे 256जीबीपर्यंत वाढवता येते.

अँड्रॉइड 10 ओएसवर आधारित या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासोबत दोन 2 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी तुम्हाला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. हा कॅमेरा डिस्प्ले नॉचच्या आतमध्ये देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली असून ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रिअर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर हे फीचर देखील या फोनमध्ये असून कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय , ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स आहेत. ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. लवकरच कंपनीकडून या फोनच्या किंमतीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.