News Flash

विद्यार्थ्यांसाठी इंस्टाग्राम आणणार खास फिचर, काय आहे खासियत?

लोकप्रीय फोटो-मेसेजिंग अॅप इन्स्टाग्राम एक नवं फिचर पडताळून पाहत आहे

लोकप्रीय फोटो-मेसेजिंग अॅप इन्स्टाग्राम एक नवं फिचर पडताळून पाहत आहे. या फिचरद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज ग्रुपमधील सहकारी आणि बॅचमेट्स शोधण्यात मदत होणार आहे.

या फिचरमध्ये विद्यार्थ्यांना प्रोफाईल बनवल्यानंतर त्यांचं कॉलेज आणि कोणत्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता हे सिलेक्ट करावं लागेल. यामुळे युजरला त्यांच्या कॉलेजमधील मिसिंग फ्रेंडला शोधणं किंवा त्याला थेट मेसेज करणं अगदी सोपं होणार आहे. सध्या या फिचरवर केवळ प्रायोगीक तत्वावर काम सुरू आहे. मात्र, फिचरची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर लवकरच जगभरातील युजर्सना हे फिचर उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या फिचरद्वारे अधिकाधीक तरुणांना आकर्षित करण्याचा इंस्टाग्रामचा प्रयत्न असणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये इंस्टाग्रामने इनेक फिचर्स जारी केले आहेत. यामध्ये इंस्टाग्राम टीव्ही(आयजीटीव्ही), व्हिडीओ चॅट, फिल्टर्स आदींचा समावेश आहे. सध्या १ अब्जाहून अधिक युजर्स इंस्टाग्रामचा दरमहिन्याला वापर करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 10:05 am

Web Title: instagram will soon launch new feature for students
Next Stories
1 ‘शांत मन असलेल्यांना मधुर स्वप्ने’
2 कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअरचा कर्करोग निदानात उपयोग
3 63 टक्के भारतीय ऑफिसच्या वेळेत सर्च करत असतात फिरायची ठिकाणं
Just Now!
X