आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही विमा कंपन्यांकडून विमा संरक्षण मिळू शकते. केंद्र सरकारने तसे   विमा कंपन्यांना दिल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारची रुग्णालये तसेच राष्ट्रीयकृत संस्थामान्य व सरकारमान्य आयुर्वेदिक रुग्णालये यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हे विमा संरक्षण असेल, असे आयुष खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रश्नोत्तरांच्या तासाला उत्तर देताना सांगितले.

या आरोग्य विमा योजनेमध्ये २० मुद्दय़ांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या उपचारपद्धतींना येणारा खर्च, त्यावरून विम्यासाठी मिळणारी ठरावीक रक्कम यांचा हिशेब मांडणे सोपे जाऊ शकते.

मंत्रालयाच्या माहितीनुसार हे मुद्दे आयआरडीए, आयुर्वेदिक रुग्णालयांचे मंडळ व विमा कंपन्या यांनी चर्चेअंती ठरवले आहेत. युनानी, सिद्धा, योगा आणि होमिओपॅथीसाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही विम्याचे संरक्षण देण्याबाबत विचार सुरू असल्याचे आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)