News Flash

रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा

वाहनांमुळे अनेक फायदे झाले आहेत, परंतु असा एकही दिवस जात नाही की अपघाताविषयी बातमी नाही.

अनिल पंतोजी

रस्ता सुरक्षा वृद्धिंगत होण्याकरिता केंद्र सरकारच्या पुढाकाराने आयआयटी, चेन्नई व राष्ट्रीय माहिती केंद्र निर्मित ्रफअऊ म्हणजे एकात्मिक रस्ते अपघात माहिती संकलन (Integrated Road Accident Data Base) या वेब अ‍ॅपबेस्ड उपक्रमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. या प्रणालीमुळे अपघात माहिती संकलनाबरोबर अपघातस्थळी वेळीच मदत पोहचविणे शक्य होणार असून अपघातांचे संशोधन व विश्लेषण करून अपघातांची विविध कारणे व अपघातप्रवण क्षेत्र निश्चित करता येतील. तसेच अपघाताची कारणेही समजण्यास मदत होणार आहे.

वाहनांमुळे अनेक फायदे झाले आहेत, परंतु असा एकही दिवस जात नाही की अपघाताविषयी बातमी नाही. खरंतर अपघात क्वचित घडला तर तो अर्थपूर्ण राहतो, नाही तर ती एक सामाजिक उणीव बनते. बहुतांश अपघात टाळले जाऊ शकतात म्हणूनच सध्या आपण वाहन अपघाताऐवजी वाहन दुर्घटना हा शब्दप्रयोग करत आहोत.

आपल्या देशात दरवर्षी साधारणपणे ४.५ लाख अपघातात अंदाजे १.५ लाख व्यक्ती जीव गमवतात, तर अंदाजे ४ लाखांपेक्षा जास्त व्यक्ती गंभीर जखमी होतात. यामध्ये बहुतांश व्यक्ती या तरुण व घरातल्या एकमेव कमावत्या असतात. वाहन अपघातांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरदेखील वाईट परिणाम होतो व देशाचे दरवर्षी सरासरी १.४७ लाख कोटींचे नुकसान होते, परंतु सर्वात महत्त्वाचे माणसाच्या जिवाची किंमत मोजता येत नाही.

आपल्या रस्त्यांचा व नवनिर्मित वाहनांचा दर्जा आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस उंचावत आहे. तरीदेखील वाहन दुर्घटना वाढतच आहेत. याला मुख्य कारण म्हणजे वाहन चालकांचा दर्जा व कौशल्य खालावत आहे. रस्ते सुरक्षित राहण्याकरिता सरकार, वाहन उत्पादक, पोलीस, परिवहन, स्वयंसेवी संस्था व आरोग्य विभाग अथक प्रयत्न करीत असतात.

अपघातांची संख्या कमी करावयाची असल्यास त्यांचा अभ्यास करून कारणे शोधणे व सखोल चौकशी केली पाहिजे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपघातपूर्व स्थितीची पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. याकामी अनुभवी, प्रशिक्षित व तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

रस्ता सुरक्षा वृिद्धगत होण्याकरिता केंद्र सरकारच्या पुढाकाराने भारतीय प्राद्योगिकी संस्था आयआयटी, चेन्नई व राष्ट्रीय माहिती केंद्र निर्मित ्रफअऊ म्हणजे एकात्मिक रस्ते अपघात माहिती संकलन (Integrated Road Accident Data Base) या वेब अ‍ॅपबेस उपक्रमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. देशातील निवडक राज्य व त्यातील काही जिल्ह्यंतून या वेब अ‍ॅपचा उपयोग केला जाणार आहे व कालांतराने याची संपूर्ण देशात वापर केला जाईल.

अपघाताचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याकरिता अपघातासंबंधी माहिती एकसारखी व अचूक संकलित करणे आवश्यक आहे, तसेच कार्यतंत्रदेखील एकच असणे गरजेचे आहे. iRAD या वेब प्रणालीचा विकास याच उद्देशाने केला आहे. प्रणाली वापराकरिता आदर्श कार्यपद्धती अनुसरल्यामुळे प्रत्येक अपघाताची सर्व संबंधित विभागांनी (पोलीस, आरटीओ, रस्ता व आरोग्य) तपासणी करून दिलेली माहिती एकत्रित ठेवणे सुलभ होणार आहे, तसेच सदर माहिती कायमस्वरूपी जतन करता येते. या उपक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण देशात केल्यानंतर यासंबंधी व्यापक माहिती उपलब्ध होईल.

iRAD द्वारा संकलित माहितीचा उपयोग

iRAD द्वारा माहितीच्या आधारे अपघातांचे संशोधन व विश्लेषण करून अपघातांची विविध कारणे व अपघातप्रवण क्षेत्र निश्चित करता येतील. तसेच अपघाताचे अंतरंग समजण्यास मदत होईल.  संकलित माहितीचा उपयोग खालील प्रकारे करता येईल.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळ केंद्र सरकार व राज्य सरकारांना रस्ते, वाहन बांधणी व अपघात या विविध विषयांवर मार्गदर्शन करेल.

वाहन उत्पादक अपघातांचा तुलनात्मक अभ्यास करू शकतील. तसेच वाहनांची रचना व बांधणी यामधील त्रुटी दूर करू शकतील. वाहनांतील प्रवाशांच्या सुरक्षेविषयी जास्त लक्ष केंद्रित करू शकतील.

विमा कंपनी विम्याचा दर कमी-जास्त करण्याकरिता तसेच अपघातांमुळे होणाऱ्या उपचाराचा खर्च व इतर नुकसानीचा अंदाज घेऊ शकेल.

अपघातस्थळी तातडीची वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे याकरिता वेळेची बचत कशी करता येईल याकरिता मार्गदर्शन होईल.

अपघाताचे दाव्यांचे दिवाणी/फौजदारी खटल्याचे सुनावणीत सदर माहितीचा वापर केला जाईल, त्यामुळे गरजूंना जलदगतीने न्याय मिळेल.

रस्ता व अपघात व्यवस्थापन

रस्त्यावर वाहन नादुरुस्त होणे, वाहनांचे अपघात होणे, टँकरसारख्या वाहनातून विषारी वायूची गळती होणे, पावसाचे पाणी साठणे किंवा धडकेमुळे प्राणी मरून पडणे यासारख्या घटना घडत असतात. अशा घटना शोधून त्यांना तात्काळ प्रतिसाद देत वाहतुकीची कोंडी न होऊ देता वाहतूक सुरळीत, सुरक्षित करणे महत्त्वाचे आहे. याकामी विविध सरकारी विभाग व रस्ता वाहतूकसंबंधी सरकारी यंत्रणा संसाधनात रस्ता सुरक्षा कामी समन्वय असणे गरजेचे आहे. समन्वयाची ही प्रक्रिया म्हणजेच रस्ते अपघात व्यवस्थापन. यात रस्त्यावरील विविध घटनांचा शोध, तिची शहानिशा, त्यांना प्रतिसाद व त्यानंतर मार्ग खुला करणे, पर्यायी मार्ग सुचविणे हे व्यवस्थापनाचे मुख्य काम आहे.रस्ता वाहतुकीविना अडथळा, सुरक्षित व कार्यक्षम राहण्याकरिता पोलीस व परिवहन विभाग रस्त्यांवर गस्त घालत असतात. तर राष्ट्रीय महामार्गावर, द्रुतगती मार्गावर खासगी गस्तीदल त्यांच्या वाहनांसह वाहतुकीवर लक्ष ठेवत गस्त घालत असतात. वाहतूक व्यवस्थापनास आवश्यक असे मनुष्यबळ, उपकरणे व इतर साहित्य तसेच विविध प्रकारची वाहने उदा. क्रेन, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन उपलब्ध असतात. वाहतूक नियंत्रण कक्ष अस्तित्वात असतो. रस्त्यावरील गरजू वाहनधारकांना मदत करण्याची जबाबदारी गस्तीदलाची असते. रस्त्यावरील घडलेल्या घटनांची माहिती गस्तीदलाद्वारे किंवा इतरांमार्फत नियंत्रण कक्षास पोहोचविली जाते व त्वरित त्यांना प्रतिसाद दिला जातो.

अपघाताचा तपास

अपघातांच्या कारणांचा शोध व तपासणी पोलीस विभाग iRAD या वेब प्रणालीद्वारे जलदगतीने करू शकतात. आपण वापरात असलेल्या स्मार्टफोनच्या साहाय्याने अपघातस्थळाची माहिती, रस्त्यांची भौगोलिक स्थिती, वाहनांचे अवशेष, वाहनांचा धडक बिंदू, वाहन स्थिती, वाहन अवकाश स्थिती इ.चे छायाचित्र व चित्रफीत काढून ते वरील प्रणालीत कायमस्वरूपी जतन करू शकतो. तसेच अपघाताशी संबंधित सर्व दुवे, पुरावे व माहिती या प्रणालीत नोंदविता येतात. परिवहन विभागातील अधिकारी वाहनांची तांत्रिक स्थिती, अपघाताचे तांत्रिक कारण याबाबत अभिप्राय नोंदवू शकतात. रस्ते विभागातील अधिकारी ज्या रस्त्यावर अपघात झाला आहे त्याची रचना, बांधणी व देखभालीबाबत अभिप्राय नोंदवू शकतात. ्रफअऊ मधील अहवालाद्वारे अपघातग्रस्त वाहनाची अपघातपूर्व पुनर्माडणी करून वाहन धडकण्यापूर्वीचा वेग, दिशा व इतर कारणांचा शोध घेणे शक्य होईल. अपघातांचे न्यायालयीन खटले कमी वेळात निकाली लागण्यास मदत होईल.

रुग्णवाहिका सेवा

अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचवण्यात रुग्णवाहिका व रुग्णसेवा उपाययोजना (इस्पितळ) महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक जिल्ह्य़ात व प्रमुख मार्गावर असलेल्या आरोग्यसंपन्न सुसज्ज इस्पितळांमुळे रुग्णांचा फायदाच होणार आहे. आपल्या राज्यात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा चांगल्या सेवेमुळे लोकप्रिय आहे. तिचा गरजेनुसार जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. आपण या वाहनांना रस्त्यावर प्राधान्य दिले पाहिजे. वाहतुकीच्या नियमांमधून रुग्णवाहिकेस सूट दिलेली आहे. रुग्णवाहिका जितक्या कमी वेळात अपघातस्थळी पोहोचेल तितका अपघातग्रस्तांचा जीव वाचण्याची शक्यता जास्त. ‘गोल्डन अवर (Golden Hour) अर्थात अपघात घडल्यापासून पहिल्या तासात अपघातग्रस्त गंभीर जखमींना मिळालेली मदत, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे आणि तेथे सुरुवातीचे तातडीचे उपचार मिळून त्यांची प्रकृती स्थिरावते. अपघातग्रस्तांना चांगल्या हेतूने मदत केल्यास कोणत्याही कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:06 am

Web Title: integrated road accident database irad mobile and web application zws 70
Next Stories
1 Covid-19 Vaccine Registration : लसीसाठी नोंदणी कशी कराल?; जाणून घ्या सहा सोप्या स्टेप्समध्ये
2 लसीकरण गरजेचे
3 सौंदर्यभान : कोड आणि उपचारपद्धती
Just Now!
X