News Flash

अ‍ॅस्पिरिनच्या रोजच्या वापराने शरीरात रक्तस्राव

रक्तस्राव होऊन प्रसंगी मृत्यू ओढवू शकतो

| June 16, 2017 01:41 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वेदनाशामक म्हणून वापरली जाणारी अ‍ॅस्पिरिनची गोळी रोज घेतली तर त्यामुळे शरीरात अंतर्गत रक्तस्राव होऊन प्रसंगी मृत्यू ओढवू शकतो, असा धोक्याचा इशारा ऑक्सफर्डमधील एका अभ्यासातून देण्यात आला आहे. संशोधकांनी ३१६६ रुग्णांची तपासणी केली असता त्यात त्यांना असे दिसून आले की, पक्षाघात व हृदयविकार असलेल्यांना या गोळ्या देण्यात आल्या होत्या. अ‍ॅँटीप्लेटलेट औषधे म्हणून अ‍ॅस्पिरिनचा वापर करण्यात येतो. दहा वर्षांच्या काळात अ‍ॅस्पिरिन घेणाऱ्या या लोकांपैकी ३१४ जणांना अंतर्गत रक्तस्रावामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. जसे वय वाढते तसा रक्तस्रावाचा धोका जास्त बळावतो. संशोधकांना असे दिसून आले की, ६५ वयाच्या आतील लोक रोज अ‍ॅस्पिरिन घेतात व त्यांच्यापैकी दीड टक्का लोकांना रक्तस्रावामुळे रुग्णालयात न्यावे लागते. ७५ ते ८४ वयोगटातील ३.५ टक्के रुग्णांना रक्तस्रावामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. तर ८५ वयापुढील ५ टक्के लोकांना रक्तस्रावामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. पासष्टीखाली रुग्णालयात दाखल करण्याचा दर ०.५ टक्के तर ७५ ते ८४ वयोगटात १.५ टक्के तर ८५ वयावरील गटात २.५ टक्के आहे, असे दी गार्डियनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. वयाच्या पंचाहत्तरीनंतर अ‍ॅस्पिरिनने होणाऱ्या अंतर्गत रक्तस्रावाचा धोका अधिक असतो, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक पीटर रॉथवेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:41 am

Web Title: internal bleeding in the body due to aspirin tablet
Next Stories
1 होणाऱ्या नवऱ्याकडून काय आहेत भारतीय मुलींच्या अपेक्षा ?
2 चष्मा वापरताना ‘या’ गोष्टींचा विचार करा, नाहीतर…
3 १० हजारांच्या बजेटमधील १० ‘स्मार्ट’ फोन
Just Now!
X