19 September 2020

News Flash

International Coffee Day : जगातील महागडी कॉफी तयार होते उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून

जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात कॉफी तयार करण्याची त्यांची अशी खास पद्धत आहे.

(छाया सौजन्य : catpoopcoffeeinc)

कॉफी हे पेय चहाइतकंच आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. ‘a lot can happen over coffee’ असं म्हटलं जातं. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल, झोप घालवायची असेल किंवा अगदी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली द्यायची असेल यात कॉफीला पर्याय नाही. कॉफीचा एक घोट कंटाळवाण्या मूडला लगेच तरतरी आणतो. अनेकांना माहितीही असेल की कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. जगभरात कॉफी हे पेय पिणारा वर्ग खूप मोठा आहे आणि जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात कॉफी तयार करण्याची त्यांची अशी खास पद्धत आहे.

या सगळ्यात civet cat coffee ही सर्वात महागडी कॉफी समजली जाते. ही कॉफी उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासून तयार केली जाते. उदमांजर कॉफीची फळं खातात. फळांचा गर ती सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही. तिच्या विष्ठेमार्फत बिया बाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिचं फळं खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे.

मांजरीच्या पोटात असलेल्या द्रव्यामुळे कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मदत होते. तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ही विष्ठा शोधणंही वेळखाऊन आणि कठीण काम आहे त्यामुळे ही कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेत जी लोक गुंतले आहेत त्यांची मजुरीही अधिक आहे. या सगळ्या कारणामुळे civet cat coffee सगळ्यात महागडी कॉफी समजली जाते. इंडोनेशियामध्येही अशाच प्रकारे महागडी कॉफी तयार केली जाते तिला Kopi Luwak म्हणूनही ओळखलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 11:11 am

Web Title: international coffee day civet cat coffee world most expensive coffee
Next Stories
1 VIDEO: इम्रान खानला भेटायला आलेल्या कुवेती अधिकाऱ्याचे पाकिस्तानी ऑफिसरने चोरले पाकीट
2 टेस्ट ट्युबद्वारे सिंहाच्या छाव्यांचा जन्म, जगातील पहिलाच यशस्वी प्रयोग
3 Video : …म्हणून सेरेना विल्यम्सने टॉपलेस होऊन गायले गाणे
Just Now!
X