आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी ८ सप्टेंबरला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात १९६६ सालापासून झाली. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता वाढवणे आणि जगभरातील लोकांचे शिक्षणाकडे लक्ष वेधणे. एक साक्षर आणि सक्षम समाज घडवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

इतिहास

जगभरात निरक्षरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी २६ ऑक्टोबर १९६६ रोजी युनेस्कोने ८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून घोषित केला. या मागचा हेतू केवळ निरक्षरतेचा मुकाबला करणेच एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. तर साक्षरतेला एक साधन म्हणून प्रोत्साहित करणे हे होते. हे एक असे साधन कि, जे प्रत्येक व्यक्तीला आणि संपूर्ण समाजाला सक्षम बनवू शकते.

International Institute of Population Sciences Mumbai Bharti For Research Officer and Junior Research Office post
IIPS Mumbai Bharti 2024: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत भरती; ५५ हजारांपर्यंत पगार, असा करा अर्ज
indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

शिक्षणाविषयी जागरूकता वाढल्याने जगभरातील अनेक लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्यांचे जीवन सुधारेल. साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा ही २६ ऑक्टोबर १९६६ रोजी करण्यात आली होती. परंतु, त्याची कल्पना सर्वप्रथम इराणच्या तेहरान येथे झालेल्या शिक्षण मंत्र्यांच्या जागतिक परिषदेच्या वेळीच मांडण्यात आली होती. ही परिषद १९६५ साली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये निरक्षरता संपवण्यासाठी जगभरात जागरूकता मोहीम चालवण्यावर चर्चा करण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस का साजरा करतात?

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट्य हे वैयक्तिक, सामुदायिक आणि सामाजिकदृष्ट्या साक्षरतेचे महत्त्व लोकांना पटवून देणे व या दिवसाच्या माध्यमातून जगभरातील लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता वाढवणे हे होते. जे कोणत्याही प्रगत समाजाच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. हा दिवस साक्षरतेकडे लोकांचे लक्ष वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे सामाजिक आणि मानवी विकासासाठी त्यांचे अधिकार जाणून घेण्यासाठी साजरा केला जातो.

जीवन जगण्यासाठी जेवढे यश मिळवणे महत्त्वाचे आहे तेवढीच साक्षरता देखील महत्त्वाची आहे. दारिद्र्य निर्मूलन, बालमृत्यू कमी करणे, लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे, लैंगिक समानता प्राप्त करणे इत्यादींसाठी हे एक आवश्यक आणि मोठे साधन आहे. साक्षरतेमध्ये कौटुंबिक दर्जा उंचावण्याची क्षमता आहे असे सांगितले जाते. म्हणूनच, हा दिवस लोकांना निरंतर शिक्षण मिळवण्यासाठी आणि कुटुंब, समाज आणि देशाप्रती असलेली त्यांची जबाबदारी समजून घेण्यासाठी जगभरात साजरा केला जातो.