आतड्याचा कर्करोग कसा पसरतो, याचे कोडे वैज्ञानिकांनी उलगडले असून त्यातून नवीन उपचार विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे. सेल बायॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध शोधनिबंधानुसार इमोर्टिन ११ हे प्रथिन कर्करोगकारक बिटा कॅटेनिन या प्रथिनांचे आतडय़ाच्या कर्करोग पेशींकडे वहन होण्यास कारणीभूत असते. तेथे कर्करोगाच्या पेशी पुढे वाढत जातात.

कॅनडातील टोरांटो विद्यापीठातील वैज्ञानिकांनी सांगितले की, या प्रथिनाचे काम रोखले तर त्यामुळे बिटा कॅटेनिनचे प्रमाण वाढून कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होईल. सुमारे ८० टक्के कर्करोग हे एपीसी जनुकातील उत्परिवर्तनाने होत असतात.

एपीसी जनुकातील उत्परिवर्तनाने बिटा कॅटेनिन प्रथिनाचे प्रमाण वाढून कर्करोग होतो. या प्रथिनाचे प्रमाण वाढून ते पेशीच्या केंद्रकात साठत जाते. तेथे पेशींच्या अनियंत्रित वाढीस कारण ठरणारी अनेक जनुके नंतर कार्यान्वित होतात. या प्रथिनामुळे मोठय़ा आतडय़ात कर्करोगाच्या गाठी वाढीस लागतात. पण हे प्रथिन पेशींच्या केंद्रकात कसे प्रवेश करते याचा उलगडा आतापर्यंत झाला नव्हता. बिटा कॅटेनिनचे वहन कसे होते हे माहिती नव्हते त्यामुळे या प्रथिनाच्या सातत्यपूर्ण क्रियाशीलतेचा अभ्यास करण्यात आला, असे स्टीफनी अँगर्स यांचे मत आहे. त्यासाठी वैज्ञानिकांनी क्रिस्पर जनुक संपादनाच्या माध्यमातून बिटा कॅटेनिनला पाठबळ देणाऱ्या जनुकांची ओळख पटवली. एपीसी जनुकातील उत्परिवर्तनामुळे या प्रथिनाचे कर्करोग पेशीतील प्रमाण कसे वाढते याचा उलगडा केला, त्यात त्यांना असे दिसून आले, की इमपोर्टिन ११ हे प्रथिनच बिटा कॅटेनिनला पेशींच्या केंद्रकात नेते.

इम्पोर्टिन ११ हे बिटा कॅटेनिनला चिक टते व त्याला पेशी केंद्रकात नेऊन सोडते. त्यामुळे इम्पोर्टिन ११ हे आतडय़ाच्या कर्करोगास कारण ठरते. त्याची क्रियाशीलता रोखून नवे औषध तयार करणे शक्य आहे.