कोणताही ऋतु असला तरी आपल्या हातांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा त्वचा कळवंडण्याची शक्यता असते. तसेच जेव्हा स्किनकेअरची गोष्ट येते तेव्हा आपल्या हातांसारख्या महत्वाच्या बाबींकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. स्वच्छ, सुंदर आणि मऊ हातांमुळे आपल्या शरीराच्या सौंदर्यात भर पडते. आपले हात सुंदर असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण त्यांची देखभाल करण्यासाठी वेळ कोणाकडेच नसतो. हातांच्या देखभालीसाठी चांगली क्रीम वापरणे उत्तम पर्याय आहे. त्यासाठी नेहमीच व्हिटॅमिन सी आणि हॅल्यूरॉनिक अॅसिडयुक्त क्रीम वापरणे फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊयात कशी घ्याल हातांची काळजी.

हाताला करा मॉइश्चरायझिंग :

आपल्या हाताची त्वचा कोरडी देखील होऊ शकते. हाताच्या मागची त्वचा ही पातळ असते. संवेदनशील त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइल सारख्या तसेच व्हिटॅमिन सी असे मॉइश्चरायझिंग घटक असलेले हँड क्रीम दररोज हाताला लावा. जेणे करून कोरड्या त्वचेला पोषण मिळते आणि हे क्रीम आपले हात हायड्रेट ठेवतात.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

अँटी-बॅक्टेरियाच्या हँड क्रीमची करा निवड :

बहुतेक वेळा आपले हात हे नकळत कोणत्या ना कोणत्या गोष्टीला लागतात आणि त्यावरील जंतू आपल्या हाताला लागतात. यामुळे आपण वारंवार हात साफ करत असतो. तसेच सध्या करोनाच्या काळात आपण हात साफ करतच रहातो. सॅनिटायझरचा जास्त वापर केल्याने आपल्या हातांची त्वचा खराब होते किंवा इन्फेक्शन होते. त्यामुळे अँटी-बॅक्टेरियाच्या हँड क्रीमची निवड करा. जेणे करून तुमच्या हाताला कोणतेही इन्फेक्शन होणार नाही व हात साफ राहतील.

उत्तम प्रतीची वापरा हँड क्रीम :

आपण जर आपल्या हातांची व चेहऱ्याची काळजी घेतली नाही तर वाढते वय आणि बदलत्या हवामानानुसार चेहऱ्याप्रमाणे हाताच्या त्वचेच्या समस्या उद्भवू लागतात. कालांतराने हातांच्या त्वचेचे डिहायड्रेशन आणि अकाली सुरकुत्या पडणे अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून उत्तम प्रतीची हँड क्रीम लावायला हवी. याने हाताची त्वचा कोरडी न पडता ओलावा रहातो व त्वचेची लवचिकता राहण्यास मदत होते.

आपले हात मऊ मुलायम राहण्यासाठी हँड क्रीम वापरणे ही एक आरोग्यदायी जीवनशैली आहे. ज्यामुळे आपले हात सुरक्षित राहू शकतात आणि हायड्रेटेड राहतात.