21 November 2019

News Flash

सर्वात मोठ्या स्क्रीनचा आयफोन येणार

२००७ मध्ये आयफोन लाँच झाला तेव्हापासून स्क्रीनची उंची वाढतच चालली आहे.

अॅपलच्या फोनबाबत कायमच चर्चा सुरू असते. कायमच अॅपलने प्रिमिअम सेगमेंटमधील अनेक फोन तयार केले आहे. काही दिवसांपासून iPhone 11 लाँच होणार असल्याच्या अनेक चर्चा सुरू होत्या. लकरच हा आयफोन लाँच केला जाणार असून बाजारात उपलब्ध होणार आहे. आयफोन ११ चे वैषिट्य म्हणजे यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी स्क्रीन असू शकते. आयफोन ११ ची स्क्रीन ६.७ इंचाची असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२००७ मध्ये आयफोन लाँच झाला तेव्हापासून स्क्रीनची उंची वाढतच चालली आहे. त्यावेळी या आयफोनची स्क्रीन ३.५ इंच होती. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार आयफोन ११ ची स्क्रीन ६.७ इंचाची असणार आहे. आयफोनमधील ही सर्वात मोठी स्क्रीन असणार आहे.

अॅपलचे विश्लेषक मिंग-ची-कुओ यांनी दावा केला की, आयफोनचे तीन नवीन फोन लवकरच लाँच केले जाणार आहेत. याची स्क्रीन ५.४ इंच, ६.१ इंच आणि ६.७ इंचाची असणार आहे. यंदाचा आयफोन गतवर्षीं आलेल्या मॅक्सपेक्षा मोठा असेल.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, iPhone 11, iPhone 11 Max आणि iPhone XR2 साठी यूरेशियन डेटाबेसमध्ये मॉडल नंबर्स फाईल केले आहेत. यामधील एक मॉडेल नंबर A21 नव्या iPhone XR2 चा मॉडेल नंबर आहे. हा फोन तीन स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये मिळणार आहे. iPhone 11 आणि 11 Max साठी A22 मॉडेल नंबर फाईल करण्यात आला आहे. यापूर्वी 22 मे रोजी कंपनीने 8 आणि 9 व्या जनरेशनेच्या इंटेल प्रोसेसर असलेल्या MacBook Pro ची नवी रेंज लाँच केली होती. पहिल्यांदाच कंपनीने MacBook मध्ये ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला होता. तसेच हे लॅपटॉप सर्वाधिक गतीचे MacBook Pro लॅपटॉप असल्याचे कंपनीने सांगितले होते. तसेच यामध्ये 6 कोअर MacBook Pro च्या तुलनेत 40 टक्के उत्तम परफॉर्मस मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते.

First Published on July 8, 2019 4:09 pm

Web Title: iphone 11 to have biggest screen ever nck 90
Just Now!
X