तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Apple या वर्षी तीन नवे iPhone लॉन्च करणार आहे. या नव्या iPhoneची नावं काय असणार आणि किती किंमत असणार याबाबत अॅपलप्रेमींमध्ये अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. पण आता याबाबत उत्सुकता जवळपास संपुष्टात आली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार iPhone XS, iPhone 9 आणि iPhone XS Plus अशी  नावं असतील. अॅपल आयफोन 2018 च्या व्हेरिअंटमध्ये 5.9 इंचाचा ओलेड डिस्प्ले असेल. दुसरं व्हेरिअंट 6.5 इंच ओलेड डिस्प्ले असलेला प्रीमियम व्हेरिअंट असण्याची शक्यता आहे. तर तिसरं व्हेरिअंटमध्ये 6.1 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल, तसंच या आयफोनची किंमतही कमी असेल.

लेस न्यूमेरिक्सने दिलेल्या वृत्तानुसार, अॅपलच्या तिन्ही नव्या iPhone चे फोटो लीक झाले असून Apple या वर्षीच तीन नवे iPhone लॉन्च करणार आहे. केवळ फोटोच नाही तर एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. Mobile Fun या युट्यूब चॅनलने iPhone XS, iPhone 9 आणि iPhone XS चा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सर्व अॅंगलने आयफोनची झलक दाखवण्यात आली असून, लॉन्च होणारे आयफोन हुबेहुब असेच असतील असा दावा करण्यात आला आहे.

अॅपलचा कमी किंमतीचा एलसीडी डिस्प्ले असलेला फोन iPhone 9 नावाने लॉन्च होईल. यामध्ये बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि सिंगल रिअर कॅमेरा असेल. 5.8 इंच ओलेड डिस्प्ले असलेल्या फोनचं नाव iPhone XS असेल. याच्याही बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. तर 6.5 इंच ओलेड डिस्प्ले असलेल्या प्रीमियम आयफोनचं नाव iPhone XS Plus असेल. या फोनला वायरलेस चार्जिंगचा पर्याय असेल, तसंच याच्याही बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.

काय असू शकते किंमत –
– iPhone 9 ची किंमत 600 ते 700 डॉलर म्हणजेच जवळपास 41,000 ते 47,900 रुपये असू शकते.
– iPhone XSची किंमत 700-800 डॉलर म्हणजेच जवळपास 47,900 ते 54,700 रुपये असू शकते.
– iPhone XS Plusची किंमत 999 डॉलर म्हणजे जवळपास 68,300 रुपयांपासून सुरू होऊ शकते.