News Flash

Apple फोन वापरताय? मग हे वाचाच! उच्च कंपनांमुळे आयफोनचा कॅमेरा होऊ शकतो खराब!

आयफोन म्हटलं की लोकं डोळे विस्फारुन पाहतात. याला कारण आयफोनमधल्या फोटो क्वालिटी होय. पण तुम्हाला माहितेय आयफोन हाय पॉवर असलेल्या इंजिनमुळे खराब होऊ शकतो.

IPhone-camera-malfunctions-high-powered-motorcycle-engines

अलिकडच्‍या काळात मोबाईल बाळगणे ही अतिशय कॉमन बाब झाली आहे. त्यातल्या त्यात आयफोन म्हटलं की लोकं डोळे विस्फारुन पाहतात. याला कारण आयफोनमधली फोटो क्वालिटी होय. आयफोन कॅमेरा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत बेस्ट फोटोज क्लिक होतात. अगदी दररोजच्या क्षणांपासून ते स्टुडिओ आणि दर्जेदार पोर्ट्रेटपर्यंत. पण तुम्हाला माहितेय तुमच्या आयफोनचा कॅमेरा बाईक्समध्ये असणाऱ्या हाय पॉवर इंजिनमुळे खराब होऊ शकतो!

आयफोन मॉडेल्समधील अपडेटेड कॅमेरा सिस्टीममध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि क्लोज-लूप ऑटोफोकस सारख्या टेक्नॉलॉजी वापरल्या आहेत. त्यामुळेच तुम्हाला अतिशय छान फोटो क्लिक करता येतात. ही यंत्रणा फोटो क्लिक करतानाच्या हालचाली, व्हायब्रेशन्स आणि गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांना अवरोध करण्यासाठी कार्य करते. जेणेकरून आपल्याला उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यात लक्ष केंद्रित करता येतं.

तुम्ही फोटो क्लिक करताना चुकून कॅमेरा हलल्यास मोबाईलमध्ये फोटो ब्लर येतो. हे टाळण्यासाठी काही आयफोन मॉडेल्समध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ही सुविधा दिली आहे. OIS मुळे फोटो क्लिक करताना तुम्ही चुकून कॅमेरा हलवला तरीही क्लिअर फोटो येतो. ओआयएस सह गायरोस्कोप सेन्सेसमुळे देखील कॅमेरा हलला तरी फोटो क्लिक करण्यास मदत होते. फोटो क्लिक करण्याची गती आणि परिणामी फोटोमधली अस्पष्टता कमी करण्यासाठी गायरोस्कोपच्या अॅंगलप्रमाणे लेन्स काम करतात.

आयफोनमधील ओआयएस आणि क्लोज्ड-लूप एएफ सिस्टम असलेल्या अनेक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू वारंवार बसत असलेल्या उच्च पातळीतील धक्क्यांमुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे आयफोनमधल्या फोटो आणि व्हिडिओंची गुणवत्ता कमी होऊ शकते. आपल्या आयफोनला या हाय व्हायब्रेशन्सपासून शक्य तितकं दूर ठेवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे.

आणखी वाचा: अॅपल कंपनीकडून आयफोन युजर्ससाठी उपयुक्त माहिती

हाय-पॉवर किंवा हाय-व्हॉल्यूम मोटरसायकल इंजिन्समध्ये तीव्र आणि उच्च पातळीची कंपने निर्माण होत असतात. ही कंपनं चासी आणि हँडलबारद्वारे निर्माण होत असतात. हाय पॉवर किंवा हाय व्हॉल्यूम इंजिनसह इतर मोटरसायकलमध्ये सुद्धा ही कंपने निर्माण होत असतात. यातून निर्माण होत असलेल्या विशिष्ट टप्प्याची तीव्रता असणाऱ्या कंपनांमुळे तुमच्या आयफोनमध्येही तुलनात्मकदृष्ट्या कंपने येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आयफोनच्या कॅमेऱ्याचं नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा इंजिन्सपासून आयफोनला दूर ठेवण्याचा सल्ला कंपनीच्या सपोर्ट पेजवर देणअयात आलेला आहे.

कोण-कोणत्या मोबाईलमध्ये आहे ओआयएस सिस्टम:
1. OIS iPhone 6 Plus, iPhone 6s Plus, iPhone 7 आणि नंतर iPhone SE (2nd Generation) मध्ये ही सिस्टम आहे. लक्षात घ्या की आयफोन 11 मध्ये अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ओआयएस नाही. आयफोन 7 प्लस आणि आयफोन 8 प्लस मध्ये टेलिफोटो कॅमेरा नाही.

2. क्लोज्ड-लूप सिस्टम AF iPhone XS आणि iPhone SE (2nd Generation) मध्ये वापरण्यात आलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2021 7:06 pm

Web Title: iphone camera malfunctions high powered motorcycle engines prp 93
Next Stories
1 Twitter मोफत वापरता येणार नाही, ‘या’ सर्व्हिससाठी मोजावे लागणार पैसे
2 WhatsApp वर तुम्हाला एखादा व्हिडीओ आला असेल, तर सावध व्हा…
3 असा आहे iPhone XS आणि iPhone XS मॅक्स
Just Now!
X