भारतातल्या आयफोनप्रेमींसाठी वाईट बातमी आहे. आयफोनने सगळ्या मोबाईल फोन्सचे भाव वाढवले आहेत. सरासरी तीन टक्के इतके भाव वाढले असून नवीन दर आजपासून (5 फेब्रुवारी) लागू होणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आयात करण्यात येणाऱ्या मोबाईल फोनवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून वाढून 20 टक्के करण्यात आली. त्याचवेळी जे पोन आयात होतात ते महाग होतील असे स्पष्ट झाले होते. अर्थात, करवाढीचा फटका कंपन्या सोसतात की ग्राहकांवर टाकतात ही उत्सुकताही होती. सध्यातरी आयफोननं दरवाढ करून ग्राहकांवर या करवाढीचा बोजा टाकल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांमध्ये आयफोनने दुसऱ्यांदा भाववाढ केली आहे. सरकारचा भर मेक इन इंडियावर असल्यामुळे विदेशी बनावटीच्या वस्तू महाग व्हाव्यात हा करवाढीचा उद्देश आहे.
आयफोनच्या विविध मॉडेल्सचे वाढीव दर पुढीलप्रमाणे असतील…

iPhone X – बहुचर्चित व नुकताच लाँच झालेला आयफोन एक्सची (64 जीबी) आधी 92,430 रुपयांना उपलब्ध होता आता त्याची किंमत 95,390 रुपये झाली आहे. तर आयफोन एक्सची (256 जीबी) जुनी किंमत 1,05,720 रुपये होती जी 3,210 रुपयांनी वधारून 1,08,930 रुपये झाली आहे.

iphone 8 – आयफोन 8 हे लोकप्रिय मॉडेलही महागले असून 64 व 256 जीबी हे दोन्ही प्रकार महागले आहेत 66,120 रुपयांचे 64 जीबीचे आयपोन 8 मॉडेल आता 67,940 रुपयांना मिळेल तर 256 जीबीचं मॉडेल 79,420 रुपयांऐवजी आता 81,500 रुपयांना मिळेल.

iPhone 8 plus – आयफोन 8 प्लस हे मॉडेल (64 जीबी) 75,450 रुपयांना होते जे आता वाढून 77,560 रुपये इतके झाले आहे तर 256 जीबीचा आयफोन 8 प्लस 88,750 रुपयांना होता जो आता 91,110 रुपयांना मिळेल.

iPhone 7 – आयफोन 7 (32जीबी) 50,810 रुपयांवरून वाढून 52,370 रुपये झाला आहे. 128 जीबीचा आयफोन 7 हा 59,910 रुपयांवरून वाढून आता 61,560 रुपये इतका महागला आहे.

iPhone 7 plus – आयफोन 7 प्लस (32 जीबी) 61,060 रुपयांवरून वाढून 62,840 रुपये झाला आहे तर 128 जीबीचा आयफोन 7 प्लस आता 72,060 रुपयांना मिळेल.

iPhone 6 S – आयफोन 6 एस (32जीबी) 41,550 रुपयांवरून वाढून 42,900 रुपये झाला आहे. तर 128 जीबीचा आयफोन 6 एस 50,660 रुपयांवरून वधारून 52,100 रुपये झाला आहे.

iPhone 6 S Plus – आयपोन 6 एस प्लस (32 जीबी) 50,740 रुपयांना होता, जो आता वधारून 52,240 रुपये झाला आहे तर 128 जीबीचा आयफोन 6 एस प्लस 59,860 रुपयांवरून वधारून 61,450 रुपये झाला आहे.

iPhone 6 – आयफोन 6 (32जीबी) हा 30,780 रुपयांना होता जो आता वधारून 31,900 रुपयांना उपलब्ध आहे.

iPhone SE – आयफोन एसईच्या किमतीत बदल झालेला नाही. हा फोन 32 जीबीसाठी 26,000 रुपये तर 128 जीबीसाठी 35,000 रुपयांनाच मिळेल.