01 June 2020

News Flash

‘स्वस्त’ आयफोनचा आजपासून ‘सेल’; मिळेल 3,600 रुपयांचे डिस्काउंटही

Apple कंपनीचा ‘स्वस्त’ iPhone SE 2020 या फोनची अखेर आजपासून भारतात विक्री

Apple कंपनीचा ‘स्वस्त’ iPhone SE 2020 या फोनची अखेर आजपासून भारतात विक्री सुरू होत आहे. फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजेपासून iPhone SE 2020 सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. गेल्या महिन्यात कंपनीने हा नवीन आयफोन लाँच केलाय.

iPhone SE 2020 हा सर्वात स्वस्त iPhone असल्याचा दावा कंपनीनं केला असला तरी त्याची सुरूवातीची किंमत 64 जीबीच्या व्हेरिअंटसाठी 42 हजार 500 रूपये आहे. पण फ्लिपकार्टवर एचडीएफसी ग्राहकांसाठी हा फोन 38,900 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. कारण एचडीएफसीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 3,600 रुपये इंस्टंट कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय फोनच्या 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 47,800 रुपये आणि 58,300 रुपये ठेवण्यात आली आहे.

फीचर्स :-
कमी किंमतीमुळे चर्चेत असलेला हा फोन लाँच करतेवेळी कंपनीने तो भारतात कधी उपलब्ध होईल आणि त्याची विक्री कधीपासून सुरू होईल याबाबत माहिती दिली नव्हती. यापूर्वी फ्लिपकार्टवर ‘कमिंग सून’ अशा बॅनरखाली हा फोन लिस्ट करण्यात आला होता. तसंच फ्लिपकार्टने फोन खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांचे रजिस्ट्रेशनही सुरू केलं होतं. भारतात विक्री नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार याबाबत मात्र घोषणा करण्यात आली नव्हती. अखेर आजपासून हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. नव्या आयफोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. F/१.८ सह १२ मेगापिक्सेलचा हा कॅमेरा असून याद्वारे 4के व्हिडीओही शूट करता येणार आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये ७ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबतच यात एचडीआर आणि पोर्टेटसारखेही फिचर्स आहेत. ब्लॅक, व्हाईट आणि (प्रोडक्ट) रेड या रंगांच्या पर्यायात नवीन आयफोन उपलब्ध असेल. iPhone SE 2020 मध्ये ४.७ इंचाचा रॅटिना HD IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये आयफोनच्या अत्याधुनिक A13 Bionic chip चा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या मोबाइलमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे. तसंच यामध्ये टच आयडी बटणही आहे. iPhone SE 2020 चा लुक iPhone 8 प्रमाणेच आहे. तसंच हा फोन IP67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे. फोनची संपूर्ण बॉडी ग्लास आणि एअरोस्पेस ग्रेड अ‍ॅल्युमिनिअमपासून बनली आहे. तसंच फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचाही पर्याय देण्यात आला आहे. फास्ट चार्जिंगसह केवळ अर्ध्या तासात हा फोन ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 11:57 am

Web Title: iphone se goes on sale with rs 3600 instant discount on flipkart know price specifications and all other details sas 89
Next Stories
1 Airtel च्या ‘या’ तीन रिचार्ज प्लॅन्सवर ‘एक्स्ट्रा टॉकटाइम’
2 रेड झोनमध्येही Amazon, Flipkart ची सेवा सुरू
3 आली Renault ची नवीन Triber, बुकिंगलाही झाली सुरूवात
Just Now!
X