२०१८ हे वर्ष सरत आले. या वर्षात जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात विविध बदल होत असताना मोबाईल कंपन्यांनी देखील सर्वोत्कृष्ट स्मार्ट फोन बाजारात आणले. अ‍ॅपल, हुवावे, सॅमसंग आणि गुगल सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी सादर केलेल्या अनेक स्मार्टफोनचा बोलबाला यावेळी पाहायला मिळाला. यापैकी सर्वात महागड्या मोबाईलविषयी आपण आज जाणून घेवू.

१- अ‍ॅपल एक्स एस मॅक्स : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या अ‍ॅपल कंपनीने आपला बहुचर्चित दमदार आयफोन एक्स एस मॅक्स यंदा बाजारात आणला. नवीन आयफोनचा डिस्प्ले ६.५ इतका आहे. या फोनमध्ये ए १२ बिओनिक चिप देण्यात आली आहे. १२ मेगापिक्सल डुअल रिअर कॅमरा सेटअप व फ्रंटला ७ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बाजारामध्ये या फोनच्या ६४ जीबी आयफोनची किंमत १.०९ लाख रुपये इतकी आहे. चालू वर्षातील हा सर्वात महागडा स्मार्ट फोन आहे.

२ – सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ : सॅमसंग कंपनीने चालू वर्षात बाजारात आणलेल्या गॅलेक्सी नोट ९ स्माटफोन देखील चांगलाच चर्चेत होता. स्मार्ट फोनसोबत ब्लूटूथशी कनेक्ट होणारे एस पेन देण्यात आले होते. पेनच्या मदतीने युजर्सला छायाचित्र टिपता येवू शकते. सोबत अ‍ॅप देखील सहजपणे सुरू केले जावू शकते. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर देण्यात आले आहे. त्याचबरोबर ४००० एमएएची बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६७,९०० तर ५१२ जीबी स्टोरज मोबाईलची किंमत ८४,९०० रुपये इतकी आहे.

३ – हुवावे मेट २० प्रो : हुवावे कंपनीने यावेळी आकर्षक मेट २० प्रो स्मार्टफोन बाजारात आणले. कॅमेराप्रेमींची काळजी या फोनमध्ये घेण्यात आली आहे. स्मार्टफोनला ४० मेगापिक्सल, २० मेगापिक्सल व ८ मेगापिक्सलचे तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. मोबाईलमध्ये ८ जी रॅम व किरीन ९८० प्रोसेसर आहे. ६.३९ इंच एमोल्ड स्क्रीन असलेल्या या स्मार्टफोनची किंमत ६९, ९९० पासून सुरू होते.

४ – वनप्लस ६ टी : वनप्लस कंपनीच्या वनप्लस ६ टी स्मार्टफोनने यंदा बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड पाई ९.०, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर व अनेक नवीन फिचर देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचा ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजचा मॉडेल ३७,९९९ रुपयांना आहे. तर ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज असलेल्या या श्रृखंलेतील मोबाईलची किंमत ४१, ९९९ रुपये आहे.

५ – गूगल पिक्सल ३ एक्स एल : जगातील दिग्गज गूगल कंपनीने नुकतेच आपला नवीन गूगल पिक्सल ३ एक्स एल स्मार्टफोन बाजरात आणला आहे. एकीकडे विविध मोबाईल कंपन्यांना दोन, तीन किंवा चार रिअर कॅमेरे देत असताना गूगलने आपल्या स्मार्टफोनला फक्त एक रिअर कॅमेरा दिला आहे. ६.३ इंचाच्या क्यूएचडी प्लस डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर देण्यात आले आहे आहे. या स्मार्टफोन श्रृखंलेतील ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत ७८,५०० रुपयांच्या घरात आहे.