उद्यापासून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. आयपीएल 2021 ची मजा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तेही मोफत घेता येणार आहे. फोनमध्ये Disney + Hotstar हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करुन तुम्ही आयपीएलचे सामने बघू शकाल. पण, यासाठी 399 रुपयांमध्ये Disney + Hotstar चं सदस्यत्व घ्यावं लागतं. मात्र, आज आम्ही जिओच्या अशा प्रीपेड प्लॅन्सबाबत माहिती देणार आहोत ज्यात तुम्हाला मोफत Disney + Hotstar ची मेंबरशिप मिळेल.

रिलायन्स जिओचा 401 रुपयांचा प्लॅन :-
Disney + Hotstar ची सेवा मिळणारा हा रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यात 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3 जीबी डेटा मिळतो. तसेच, 6 जीबी अतिरिक्त डेटाही मिळतो. म्हणजे यात एकूण 90GB डेटा ग्राहकाला वापरता येतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सची मोफत मेंबरशिप मिळेल.

रिलायन्स जिओचा 598 रुपयांचा प्लॅन :-
हा कंपनीडा दररोज 2 जीबी डेटा देणारा लोकप्रिय प्लॅन आहे. याची वैधता 56 दिवस असून एकूण 112 GB डेटा वापरण्यास मिळतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय एक वर्षासाठी डिझ्नी + हॉटस्टारची मेंबरशिप आणि जिओ अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळेल.

रिलायन्स जिओचा 777 रुपयांचा प्लॅन :-
रिलायन्स जिओच्या 777 रुपयांच्या प्लॅची वैधता 84 दिवस आहे. यात दररोज 1.5 जीबी डेटा आणि 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 131 GB डेटा या प्लॅनमध्ये वापरण्यास मिळतो. यातही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय एक वर्षासाठी डिझ्नी + हॉटस्टारची मेंबरशिप आणि जिओ अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळेल.

रिलायन्स जिओचा 2599 रुपयांचा प्लॅन :-
हा कंपनीचा सर्वात महागडा प्लॅन आहे. ३६५ दिवस म्हणजे वर्षभराची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. यात 10 जीबी अतिरिक्त डेटाही मिळतो, म्हणजे एकूण 740GB डेटा यात वापरता येतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सची मोफत मेंबरशिपही मिळते. या प्लॅनमध्येही मोफत Disney + Hotstar ची मेंबरशिप मिळते.