IQOO इंडियाने भारतात नवीन 5G स्मार्टफोन IQOO 3 लाँच केला आहे. कंपनीने हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केलाय. 24 फेब्रुवारी रोजी लाँच झालेला भारतातील पहिला 5G फोन realme X50 pro च्या तुलनेत iQOO 3 कमी किंमतीत लाँच झालाय. IQOO 3 च्या विक्रीसाठी 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स संकेतस्थळ Flipkart आणि कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ iQOO.com वर पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.

(आणखी वाचा -प्रतीक्षा संपली! देशातला पहिला 5G स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

( आणखी वाचा – ’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच)

फीचर्स :-
IQOO 3 या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल HD+ रेझोल्यूशनचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या खालील बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे. याद्वारे अवघ्या 0.31 सेकंदांमध्ये फोन अनलॉक होईल असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय वरच्या बाजूला पंच होल कॅमेरा आहे. कंपनीने या फोनच्या स्क्रीनला ‘Polar View Display’ असे नाव दिले आहे. याशिवाय फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड स्नॅपर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये 20X डिजिटल झूमचा सपोर्ट असून सुपर नाइट मोड हे फीचरही आहे. तसेच, गेमिंगसाठी खास फीचर देण्यात आले आहे. यामध्ये गेमिंगसाठी अल्ट्रा गेम मोड देण्यात आला आहे. यामुळे गेम खेळताना नोटिफिकेशन आणि कॉल ब्लॉक करता येतात. याशिवाय 4D गेमिंग व्हाइब्रेशन आणि मल्टी टर्बो फीचरही आहे.

( आणखी वाचा – ’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच, Fortuner ला टक्कर)

किंमत :-
हा फोन IQOO UI 1.0 वर आधारित अँड्रॉइड 10 वर काम करतो. तसेच 4,400mAh ची दमदार बॅटरी असून ही बॅटरी 55W सुपर फ्लॅश चार्जमुळे 15 मिनिटात 50% चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. IQOO 3 या फोनच्या 8GB रॅम +128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 36 हजार 990 रुपये आहे, 8GB रॅम +256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39 हजार 990 रुपये आणि 12GB रॅम +256GB स्टोरेज (5G) ची किंमत 44 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, रिअलमी X50 प्रोच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 37 हजार 999 रुपये आहे.

( आणखी वाचा – Samsung चा ‘मेगा मॉन्स्टर’ फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

(आणखी वाचा – स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)

(आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

(आणखी वाचा -Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)