22 October 2020

News Flash

IRCTC सोबत करा दक्षिण भारताची सैर, या ठिकाणी फिरण्याची संधी

दिवाळीनंतर फिरायला जायचा विचार करताय?

दिवाळीनंतर निसर्गरम्य स्थळावर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत आहात का? असं असेल तर इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिज्म कॉर्पोरेशनने (IRCTC) तुमच्यासाठी खास प्लॅन आणला आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला दक्षिण भारताची सैर करण्याची संधी मिळणार आहे. आयआरसीटीसीनं ‘DAKSHIN BHARAT YATRA’ या नावानं १२ रात्री आणि १३ दिवसाचं टुरिज्म पॅकेज आणलं आहे. याची सुरुवात १७ नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशमधील गोरखपुर स्थानकातून होणार आहे.

कुठे कुठे फिरण्याची मिळणार संधी ?
त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुराय, तिरुपती, कोवल, तिरुच्चीराप्पल्ल , मल्लिकार्जुन तसेच केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर, रामनाथस्वामी मंदिर, मीनाक्षी या मंदिरासह इतर दक्षिण भारतातील मंदिराचा समावेश

काय काय असेल या पॅकेजमध्ये?
या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना स्लीपर क्लासने प्रवास करावा लागेल. तसेच नॉन एसी रूममध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच साइट सीनसाठी बसचाही वापर होणार आहे. या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाचाही समावेश आहे.

बोर्डिंग पॉइंट कोणते?
गोरखपूर, बस्ती, गोंडा, बाराबंकी, लखनऊ, कानपुर, इटावा, भिंड, ग्वालियर आणि झांसी

या पॅकेजची किंमत किती असेल?
‘DAKSHIN BHARAT YATRA’ या पॅकेजची बुकिंग तुम्ही प्रतिव्यक्ती १२ हजार २८५ रुपयांत करु शकता. ग्रुप बुकिंगसाठी कोणतीही अतिरिक्त सूट देण्यात आलेली नाही.

कशी कराल बुकिंग?
रिजर्वेशन काउंटरवर किंवा IRCTC च्या संकेतस्थळावरुन ‘DAKSHIN BHARAT YATRA’ या पॅकेजचं बुकिंग करु शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 4:06 pm

Web Title: irctc is going to visit south india will get a chance to visit many places including kanyakumari and rameswaram nck 90
Next Stories
1 समजून घ्या : दिनेश कार्तिकने हंगामाच्या मध्येच KKR चं कर्णधारपद का सोडलं??
2 आज ‘नीट’ परीक्षेचा निकाल? असा करा चेक
3 समजून घ्या : भारताने बनवलं थेट शत्रूचं रडार भेदणारं क्षेपणास्त्र
Just Now!
X