मधुमेह आणि स्थूलता या सध्या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. कुटुंबात एका व्यक्तीला तरी मधुमेह असतोच. या मधुमेहाबाबत सामान्यांमध्ये अनेक समज-गैरसमज असलेले दिसतात. त्यातीलच एक समज म्हणजे मधुमेहाची समस्या अनुवंशिक आहे हा आहे. आता खरंच हा मधुमेह अनुवंशिक आहे का? तर तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे मधुमेह ही गुणसूत्रांमुळे होणारी गोष्ट आहे. पालकांपैकी एकाला मधुमेह असेल तर ३३ टक्के मुलांना तो होतो. तसेच आई-वडिल दोघांनाही मधुमेह असेल तर ६६ टक्के मुलांमध्ये मधुमेह होतो.

स्थूलतेच्या बाबतीत मात्र ही गोष्ट अजिबात खरी नाही. मधुमेह आणि अनुवंशिकता याचा संबंध नाही. आई-वडिलांची प्रकृती आणि मुलांची प्रकृती यांचा थेट संबंध नसतो. त्या विशिष्ट कुटुंबातील खाण्यापिण्याच्या पद्धतींवर स्थूलतेचा मुद्दा अवलंबून असतो. त्यामुळे आई-वडिल जाड असल्याने मी जाड किंवा ते बारीक असल्याने मी बारीक आहे हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात या गोष्टी शास्त्रीयदृ्ष्ट्या अजिबात योग्य नाहीत. त्यामुळे आपल्या मनात असणारे अशाप्रकारचे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.