Itel Vision 1 हा स्मार्टफोन नवीन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा फोन गेल्या वर्षी 2GB रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच झाला होता. आता कंपनीने हा फोन 3GB रॅम व्हेरिअंटमध्ये आणला आहे. किंमत आणि रॅमचा फरक वगळता दोन्ही मॉडेल्समधील सर्व फीचर्स सारखेच आहेत. 4,000 एमएएच क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये मागच्या फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय फेस अनलॉक फीचरही देण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
या फोनला ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असून अँड्रॉइड 9 पायवर हा कार्यरत आहे. यात 6.09 इंचाचा एचडी+ (720 x 1560 पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले आहे. ओक्टा-कोर युनिसोक SC9863A प्रोसेसर या फोनमध्ये आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डद्वारे 128 जीबीपर्यंत वाढवता येते. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 8-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा आणि एक 0.08-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. या सेटअपसोबत एलईडी फ्लॅश देखील आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कॅमेऱ्यासाठी AI ब्यूटी मोड, पोर्ट्रेट मोड, एचडीआर आणि ऑटोमॅटिक सीन रिकग्निशन यांसारखे फीचर्स आहेत.

किंमत किती आणि सेल कधी?
itel च्या 2 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 5,499 रुपये आहे. तर, नवीन लाँच झालेल्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपासून Itel Vision 1 या फोनसाठी फ्लिपकार्टवर सेलला सुरूवात होईल. हा फोन ग्रेडेशन ब्लू आणि ग्रेडेशन ग्रीन अशा दोन कलर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.