News Flash

मांसाहारींपेक्षा शाकाहारींचे जीवनमान जास्त!

शाकाहारी जेवण जेवणारी लोक मांसाहार करणार्‍यांपेक्षा जास्त जगत असल्याचे एका संशोधनाअंती समोर आले आहे.

| September 2, 2013 07:35 am

श्रावण महिना चालू असल्यामुळे सध्या मांसाहाराला कित्येकजणांनी आराम दिला आहे. पण, ज्या व्यक्ती पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शाकाहारी जेवण जेवणारी लोक मांसाहार करणार्‍यांपेक्षा जास्त जगत असल्याचे एका संशोधनाअंती समोर आले आहे.
शाकाहारी असलेले मांसाहार करणार्‍यांपेक्षा किमान सहा तर जास्तीत जास्त दहा वर्षे तरी जास्त जगत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. लोमा लिंडा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कॅलिफोर्नियामध्ये केलेल्या संशोधनानुसार, मांसाहारींपेक्षा शाकाहार करणारे पुऱुष किमान ८३.३ वर्ष तर महिला ८५.७ वयोमानापर्यंत जगतात. या संशोधनासाठी अमेरिका आणि कॅनडामधील ९६ हजार लोकांचे परीक्षण करण्यात आले होते. ‘फूड ऍण्ड न्यूट्रिशियन कॉन्फरन्समध्ये’ याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 7:35 am

Web Title: its official vegetarians live longer than meat eaters study
टॅग : Lifestyle
Next Stories
1 जास्त टीव्ही पाहण्याने वाढतो मधुमेह!
2 गर्भधारणेसाठी लाभदायी चहा!
3 पांढ-या केसांची समस्या
Just Now!
X