जॅग्वार लँड रोवर इंडियाने आपली नवी एसयूव्ही Jaguar F-PACE ला पेट्रोल इंजिनासह लॉन्च केलं आहे. Jaguar F-PACE च्या पेट्रोल इंजिनच्या नोंदणीसाठी सुरुवातही झाली आहे. 63.17 लाख रुपये इतकी या शानदार कारची किंमत ठेवण्यात आली आहे, तर 63.57 लाख रुपये इतकी डिझेल व्हेरिअंटची किंमत आहे.

जॅग्वार एफ-पेसच्या पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 2-लिटरचं 4 सिलेंडर असलेलं टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 247 bhp ची पावर आणि 365 Nm टॉर्क जनरेट करतं. अवघ्या सात सेकंदांमध्ये ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडते, असं कंपनीचा दावा आहे. कारचा सर्वोच्च स्पीड 217 किमी प्रतितास इतका आहे.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी
Navi Mumbai Municipal Corporation, Achieves, Record Property Tax, Collection, 716 Crore , financial year, 2023-2024,
नवी मुंबईत ७१७ कोटी मालमत्ता कर जमा, गतवर्षीपेक्षा ८३.६६ कोटी जास्त करवसुलीचा दावा

फिचर्सबाबत सांगायचं झालं तर यामध्ये माहिती आणि मनोरंजनासाठी 10.2 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. याशिवाय, वाय-फाय हॉटस्पॉट, 360 डिग्री पार्किंग सेंसर, प्रो सर्विसेज, ड्रायव्हर कंडीशन मॉनिटर, पार्क असिस्ट, लेन कीप डिस्टन्स, कॅबिन एअर आयनिसेशन यांसारखे अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत.