बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित जावा मोटरसायकल आपल्या 90व्या वर्धापनदिनाला फक्त ९० गाड्यांची खास आवृत्ती काढणार आहे.
फ्रँटीजेक जानेसेक यांनी १९२९ मध्ये अगोदरच्या झेकोस्लोव्हाकियामध्ये जावा मोटारसायकल्सची स्थापना केली आणि जावा ५०० ओएचव्ही या जावा ब्रँडच्या पहिल्या मोटारसायकलची संकल्पना प्रत्यक्षात आली. या घटनेचा 90 वा वर्धापनदिन साजरा करण्याच्या निमित्ताने क्लासिक लीजेन्डस् प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारतात जावाची ‘90वा वर्धापनदिन आवृत्ती’ आणली आहे.

यानिमित्ताने खास ९० गाड्यांची आवृत्ती काढण्यात येणार आहे. प्रत्येक मोटारसायकलच्या इंधन टाकीवर 90व्या वर्धापनदिनाचा संस्मरणीय लोगो आणि मोटारसायकलचा वैयक्तिक क्रमांक असेल. नियमित जावा ड्युअल चॅनेल एबीएस मोटारसायकलच्या तुलनेत किमतीत काहीही बदल नसून ही नवी आवृत्ती नव्या लाल आणि हस्तिदंती रंगाच्या छमध्ये असून ती ताबडतोब वितरणासाठी उपलब्ध असेल.
ही मोटारसायकल जनतेला दिनांक 15 ऑक्टोबर 2019 पासून जावा विक्रेत्यांकडे उपलबद्ध अशणार आहे. ज्या ग्राहकांनी या अगोदर जावा मॉडेलचे बुकिंग केले आहे आणि जे ग्राहक दिनांक 22 ऑक्टोबर 2019 च्या मध्यरात्रीपूर्वी बुकिंग करतील त्यांना ही मोटारसायकल आपल्या मालकीची करता येईल. जे ग्राहक या सोडतीद्वारे निवडले जाणार नाहीत ते आपोआप आपल्या मूळ मॉडेल बुकिंग यादीत परततील. एकदा मोटारसायकल सोडत पार पडली की मोटारसायकली ताबडतोब ग्राहकांनी नेमून दिलेल्या जागी पाठविल्या जातील.

मोटारसायकलीच्या तांत्रिक विवरणात काहीही बदल नाहीत. ही 293सीसी शक्तीची असून, द्रव शीत, एक सिलेंडर, आणि ट्यून केलेल्या डबल क्रॅडल चेसीस सोबत डीओएचसी इंजिनमुळे मिळणाऱ्या सुंदर प्रचालन आणि स्थिरता असल्यामुळे ही नवी जावा आधुनिक आणि उत्कृष्ट आहे. जावा आणि जावा फॉर्टी टू यांची किंमत अनुक्रमे भारतीय रु. 1,64,000/- आणि भारतीय रु. 1,55,000/- (एक्स शोरूम, दिल्ली) आणि ड्युअल चॅनेल एबीएस प्रकार यांची किंमत अनुक्रमे भारतीय रु. 1,72,942/- आणि भारतीय रु. 1,63,942/- इतकी असेल.