‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या मालकिची क्लासिक लीजंड्स या कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘जावा’ ही अत्यंत प्रतिष्ठेची व भारतात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेली मोटरसायकल लाँच केली होती. अखेर याच महिन्यापासून कंपनी ही बाइक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरूवात करणार आहे. मात्र, ड्युअल चॅनल एबीएस फीचर असलेल्या ‘दी जावा’ आणि ‘जावा 42’ याच दोन बाइक्सची डिलिव्हरी सध्या कंपनीकडून सुरू केली जाणार आहे. भरघोस प्रतिसाद मिळाल्याने कंपनीकडून ग्राहकांना 3 ते 6 महिन्यांचा ‘वेटिंग पिरेड’ देण्यात आला आहे. पण आता अखेरीस पहिली खेप ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरूवात होत आहे.
या दोन मॉडेल्समध्ये 293 सीसीच्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल 1929 साली जन्माला आलं ते 499 सीसीचं होतं. जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल 1929 साली जन्माला आलं ते 499 सीसीचं होतं. इटलीमधल्या वरेसी इथल्या तांत्रिक केंद्रामध्ये जगातील आघाडीच्या इंजिन तज्ज्ञांबरोबर काम केल्यानंतर नवीन जावा तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाईकचं वैशिष्ट्य सांगताना आयुष्यभर साथ देईल असं नमूद करण्यात आलं आहे. इंजिनच्या एगझॉट यंत्रणेवर विशेष मेहनत घेण्यात आली असून योग्य त्या पाईपांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे हवा तो परिणाम साधला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
Jawa Motorcycles स्पेसिफिकेशन्स –
सहा गियरबॉक्स
इंजिन 293सीसी
लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर
डीओएचसी (डुअल ओवरहेड कॅमशाफ्ट)
गोल हेडलाइट
डिसपर्शन स्टाइलमध्ये लेन्
ड्युअल डिस्क ब्रेक
मुंबईतील जावा शोरूम –
वांद्रे : के. के. मोटर्स – बिल्डींग नं 264, तळमजला, ब्ल्यू हेवन बिल्डींग, 30वा रस्ता, टीपीएस लेन, तृप्तीच्या मागे, वांद्रे (पश्चिम)
चेंबूर: युवराज मोटर्स- शॉप नं 4 आणि 5 तळमजला, श्रीपाल बिल्डींग, छाया को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, व्ही. एन. पुरव मार्ग, चेंबूर
वाशी: आरव ऑटोमोबाईल्स – शॉप नं 5 ते 11, तळमजला, यशवंत आर्केड सीएचएस लिमिटेड. प्लॉट नं. 56-58, 90, सेक्टर 6, कोपरखैरणे, नवी मुंबई
ठाणे: युवराज मोटर्स- झेड-5, फ्लॉवर व्हॅली शॉपिंग कॉम्पलेक्स, इस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्विस रोड, ठाणे (प)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 12:08 pm