09 August 2020

News Flash

Perak Fridays : अंधारात घ्या ‘टेस्ट राइड’, सोबत असेल रायडर्सची टीम

10 हजार रुपयांत बाइकच्या बुकिंगसाठी झालीये सुरूवात

महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिच्या क्लासिक लीजंड्स कंपनीने आपली बॉबर स्टाइल बाइक Jawa Perak साठी एक जानेवारी 2020 पासून बुकिंग घ्यायला सुरूवात केलीये. आता, जावा मोटारसायकल्सने देशभरातील विद्यमान आणि संभाव्य अशा दोन्ही ग्राहकांसाठी ‘पेराक फ्रायडेज’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नुकत्याच लाँच झालेल्या पेराकच्या ‘नाईट राइड्स’चा समावेश आहे. सोबतच ग्राहकांना पेराकची अंधारामध्ये चाचणी घेण्याची संधी मिळेल. ‘पेराक फ्रायडेज’ अंधारामध्ये चाचणी घेण्याची संकल्पना प्रथमच देशात राबवली जात आहे. एप्रिल २०२० मध्ये पेराक बाइकचे वितरण सुरू झाल्यानंतर पेराकच्या मालकांसाठी ‘नाईट राइड्स’ म्हणजे संपूर्ण रात्रीच्या प्रवासाचा कार्यक्रम राबवला जाईल. कंपनीसाठी ‘जावा’ आणि ‘जावा फोर्टी’ या गाड्यांचे मालक आणि शिवाय काही स्थानिक ‘जावा क्लब’ या पहिल्याच पेराक राइडमध्ये सहभागी होणार आहेत.

नोव्हेंबर 2019 मध्ये ही बाइक कंपनीने भारतात लाँच केली होती. एक जानेवारी 2020 पासून या बाइकच्या बुकिंगसाठी सुरूवात झालीये. 10 हजार रुपयांत कंपनीच्या संकेतस्थळावरुन किंवा डिलर्सकडून बाइक बुक करता येईल, तर 2 एप्रिल 2020 पासून या बाइकची डिलिव्हरी सुरू होणार आहे. 1.95 लाख रुपये इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत आहे. कस्टम स्टाइल असलेल्या या बाइकची भारतात Royal Enfield, बजाज डोमिनार आणि harley davidson यांसारख्या बाइकशी टक्कर असणार आहे. ही एक बॉबर स्टाइल बाइक आहे. यात स्विंगआर्म आणि मागे ट्विन सस्पेंशनच्या जागी एकच मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे.

इंजिन –
1946 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस पॅरिस मोटर शोमध्ये सादर केलेल्या बाइकच्या नावावरुन ‘जावा पेराक’ हे नाव घेण्यात आलं आहे. जुन्या पेराक बाइकमध्ये 250सीसी क्षमतेचं इंजिन होतं, तर नव्या पेराकमध्ये 334सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 30bhp ची ऊर्जा आणि 31 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. 6 स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय देखील यात आहे. पॉवर आणि टॉर्कच्या तुलनेत ही बाइक Classic आणि Forty Two ला मागे सोडते.

मुख्य फीचर्स –
जावा Classic आणि 42 मध्ये जिथे ड्रम ब्रेक सेटअप आहे. तिथे Perak मध्ये ड्युअल चॅनल ABS सोबत मागे आणि समोर डिस्क ब्रेक्स दिले आहे. या बाइकच्या पुढील बाजूला 18 इंचाचे स्पोक व्हिल आहेत, तर मागील बाजूला 17 इंच व्हिल आहे. बाइकमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस ब्रेकिंग सिस्टिम आहे. बाइकच्या हेडलाइटवर डिजिटल मीटर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 4:47 pm

Web Title: jawa motorcycles has activated a campaign called perak fridays sas 89
Next Stories
1 ‘पॉप-अप’ सेल्फी कॅमेऱ्याचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच
2 प्रतीक्षा संपली! बजाजच्या Chetak चं पुनरागमन; 2 हजारांत बुकिंगला सुरूवात
3 दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, विविध पदांसाठी निघाली मेगाभरती
Just Now!
X