News Flash

Jawa Perak च्या डिलिव्हरीसाठी अखेर सुरूवात, 10 हजारांत सुरू आहे बुकिंग

बॉबर स्टाइल बाइक Jawa Perak ची डिलिव्हरी सुरू...

गेल्या वर्षी लाँच झालेल्या बहुचर्चित बॉबर स्टाइल बाइक Jawa Perak ची डिलिव्हरी देण्यास अखेर कंपनीकडून सुरूवात झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकीच्या क्लासिक लीजंड्स कंपनीने ही बाइक लाँच केली होती. पण, अद्याप या बाइकच्या डिलिव्हरीसाठी कंपनीने सुरूवात केली नव्हती. अखेर  20 जुलैपासून डिलिव्हरीसाठी सुरूवात झाली आहे. तसेच, 10 हजार रुपयांमध्ये या बाइकसाठी बुकिंगही सुरू आहे. तसेच,  बाइक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पहिले तीन महिने ईएमआयवर 50 टक्के सवलतीची ऑफरही कंपनीने आणली आहे.

अजून वाचा : ( भरघोस डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करा Maruti च्या कार, कंपनीने आणली शानदार ऑफर)

इंजिन-
1946 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस पॅरिस मोटर शोमध्ये सादर केलेल्या बाइकच्या नावावरुन ‘जावा पेराक’ हे नाव घेण्यात आलं आहे. जुन्या पेराक बाइकमध्ये 250सीसी क्षमतेचं इंजिन होतं, तर नव्या पेराकमध्ये 334सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 30bhp ची ऊर्जा आणि 31 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. 6 स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय देखील यात आहे. पॉवर आणि टॉर्कच्या तुलनेत ही बाइक Classic आणि Forty Two ला मागे सोडते.

  (छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट ऑप्शन आहे ‘ही’ देशातील सर्वात स्वस्त कार! किंमत फक्त….)

मुख्य फीचर्स-
जावा Classic आणि 42 मध्ये जिथे ड्रम ब्रेक सेटअप आहे. तिथे Perak मध्ये ड्युअल चॅनल ABS सोबत मागे आणि समोर डिस्क ब्रेक्स दिले आहे. या बाइकच्या पुढील बाजूला 18 इंचाचे स्पोक व्हिल आहेत, तर मागील बाजूला 17 इंच व्हिल आहे. बाइकमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस ब्रेकिंग सिस्टिम आहे. बाइकच्या हेडलाइटवर डिजिटल मीटर आहे.

(टोयोटाच्या ‘इनोव्हा’ला देणार तगडी टक्कर, लाँच झाली शानदार MG Hector Plus)

किंमत –
1 लाख 94 हजार 500 रुपये इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत आहे. कस्टम स्टाइल असलेल्या या बाइकची भारतात Royal Enfield, बजाज डोमिनार आणि harley davidson यांसारख्या बाइकशी टक्कर असणार आहे. ही एक बॉबर स्टाइल बाइक आहे. यात स्विंगआर्म आणि मागे ट्विन सस्पेंशनच्या जागी एकच मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे.

(प्रतीक्षा संपली! Honda City नेक्स्ट जनरेशन झाली लाँच)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 2:09 pm

Web Title: jawa perak deliveries to starts across india get all details sas 89
Next Stories
1 64MP कॅमेऱ्याचा Redmi Note 9 Pro Max खरेदी करण्याची पुन्हा संधी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2 Realme च्या ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा आज भारतात पहिलाच ‘सेल’, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी
3 फावल्या वेळात मुलांना भूक लागते? मग जंकफूडऐवजी द्या ‘हे’ पौष्टिक पदार्थ
Just Now!
X