News Flash

दिसतं तसं नसतं! ‘जेलो’च्या नव्या फॅशनची सगळीकडेच चर्चा

अमेरिकन सिंगर, अभिनेत्री जेनिफर लोपेझच्या फॅशनची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.

जेलोनं परिधान केलेल्या जगप्रसिद्ध ब्रँड वर्साचीच्या डेनिम बुटानं सगळ्यांना आकर्षित केलं आहे.

फॅशन विश्व हे फारच अजब. इथे कोणताही ट्रेण्ड स्थिर नसतो. जे जगावेगळं असेल त्याचा बोलबाला या विश्वात अधिक. ट्रेंडच्या बाबतीत अस्थिर पण तितक्यात ग्लॅमरस अशा या फॅशनविश्वात सध्या जेलो म्हणजेच अमेरिकन सिंगर, अभिनेत्री जेनिफर लोपेझच्या फॅशनची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.

जेलोनं परिधान केलेल्या जगप्रसिद्ध ब्रँड वर्साचीच्या डेनिम बुटानं सगळ्यांना आकर्षित केलं आहे. पांढरा शर्ट आणि त्यावर फिकट रंगाच्या डेनिमचे शूज अशा जेलोच्या हटके लूकचे फोटो वर्साचीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले. हे फोटो पाहून फार पूर्वी कंबरेवरून खालपर्यंत घसरत येणाऱ्या जीन्सच्या ट्रेंडची आठवण अनेकांना आली. किंबहुना जेलोनं घरंगळत खाली येणारी जीन्स नाही तर शूज घातेल आहेत हेही प्रथमदर्शी अनेकांना लक्षात आले नाही.

त्यामुळे लांबून हुबेहुब जिन्स पँटसारख्या दिसणार्या या डेनिम बुटांचा हटके लूक अनेकांना आवडला सध्या जेलोच नाही तर अनेक सेलिब्रिटींमध्ये या डेनिम बुटांचा ट्रेंड रुजू होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 2:18 pm

Web Title: jennifer lopez denim boots trends goes viral on social media
Next Stories
1 प्री-बूकिंगआधीच Reliance Jio GigaFiber च्या किंमती झाल्या लिक, जाणून घ्या डिटेल्स
2 या व्हायरल फोटोंचं सत्य वाचून तुम्ही व्हाल अवाक् !
3 शब्द पाळला! ‘शूज डॉक्टर’साठी आनंद महिंद्रांनी दिली अनोखी भेट
Just Now!
X