News Flash

Reliance Jio Double Dhamaka Offer : जिओची ‘डबल धमाका’ ऑफर लाँच

Reliance Jio Double Dhamaka Offer 1.5gb additional data per day on prepaid recharges : मिळणार जास्तीचा डेटा आणि रिचार्जच्या किंमतीवरही सूट

Reliance Jio Double Dhamaka Offer

Reliance Jio Double Dhamaka Offer 1.5GB additional data per day on prepaid recharges :रिलायन्स जिओ दिवसागणिक नवनवीन ऑफर्स जाहीर करत आपल्या ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिओने नुकतीच आणखी एक ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये जिओ ग्राहकांनी जिओचा कोणताही प्लॅन घेतला तरी त्यावर १.५ जीबी डेटा मिळणार आहे. ही ऑफर ३० जूनपर्यंत लागू असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एअरटेलने नुकतीच आपल्या १४९ आणि ३९९ रुपयांच्या प्लॅनवर १ जीबी डेटा देण्याचे जाहीर केल्यानंतर जिओने १.५ जीबी देण्याची घोषणा केली आहे.

जिओच्या १४९, ३४९ आणि ३९९ व ४४९ या प्लॅनवर ग्राहकांना रोज ४ जी ३ जीबी डेटा मिळणार आहे. तर ज्यावर आता २ जीबी डेटा मिळतो त्यावर ३.५, ३ जीबी मिळत असेल तर ४.५, ४ जीबी मिळत असल्यास ५.५ आणि ५ जीबी असेल तर ६.५ जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच जिओने ३०० रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर जवळपास १०० रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. सध्या २०० रुपयांच्या रिचार्जवर २० टक्के सूट मिळणार आहे. जिओ अॅपमध्ये रिचार्ज केल्यावरही ही ऑफर मिळू शकणार आहे.

याआधीही जिओने इंटरनेटसाठी अनोखे प्लॅन देत आपल्या ग्राहकांना खुश केले होते, त्यात आणखी एक भर पडली आहे. याशिवाय ग्राहकांना जिओकडून लवकरच १ हजार रुपयांच्या आत ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध होणार आहे. यात मिळणाऱ्या इंटरनेटला १०० MBPSचा स्पीड असेल. शिवाय फ्री कॉलिंग, लाईव्ह जिओ टिव्ही यांसारख्या अतिरिक्त सुविधादेखील देण्यात येणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात असलेल्या इतर कंपन्यांना पुन्हा एकदा कोट्यावधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या त्यांनी ५०० रुपयांत १००GB डेटा हा प्लान काही शहरात प्रायोगिक पातळीवर सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 7:53 pm

Web Title: jio double dhamaka offer launched with 1 5gb extra data rs 100 discount on more than 300 rs recharge
टॅग : Reliance
Next Stories
1 सॅमसंग कार्निवलला सुरूवात , स्मार्टफोनवर 12 हजारापर्यंत सूट
2 1 हजारापेक्षा कमी किंमतीत मिळणारे टॉप 5 वाय-फाय हॉटस्पॉट
3 फेसबुक घेऊन येतंय चांगल्या आठवणींचा लेखाजोखा मांडणारं नवं पेज
Just Now!
X