News Flash

१०० टक्के कॅशबॅक देणारा जिओचा धमाकेदार प्लॅन लाँच 

हा प्लॅन १८ ऑक्टोबर रोजी सुरु झाला असून तो ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. जिओच्या सर्व ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल असे कंपनीने कळवले आहे. 

दिवाळी आली की वेगवेगळ्या कंपन्या आपल्य़ा ऑफर्स लाँच करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलीकॉम ऑपरेटर कंपन्यांची धडपड सुरु असते. रिलायन्स जिओने बाजारात दाखल होत मागच्या दिड वर्षात खळबळ उडवली आहे. जिओने मोफत इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा दिल्याने इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतरही एकाहून एक आकर्षक प्लॅन जाहीर करत कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करण्याचे ठरवले आहे. दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने आणखी एक खास ऑफर जाहीर केली आहे. दिवाळी जिओ ऑफर असं या नव्या प्लॅनचे नाव आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. हा प्लॅन १८ ऑक्टोबर रोजी सुरु झाला असून तो ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. जिओच्या सर्व ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल असे कंपनीने कळवले आहे.

जिओच्या या प्लानची किंमत १६९९ रुपये असून त्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. याशिवाय हे रिचार्ज केल्यास ग्राहकांना रोज १०० एसएमएस मिळणार आहे. विशेष म्हणजे जिओच्या या प्लॅनची मुदत एक वर्षासाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ५४७.५ जीबी डेटा मिळणार असून तो संपल्यानंतर ६४ kbps चा स्पीड मिळणार आहे. १०० टक्के कॅशबॅक आणि इतक्या सुविधा देणारा हा प्लॅन ग्राहकांसाठी निश्चितच फायदेशीर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 8:50 pm

Web Title: jio exciting diwali offer 100 percent cashback on 1699 plan
Next Stories
1 कॅनरा बँकेत ८०० जागांसाठी भरती
2 एकाहून जास्त बँक खाती आहेत? मग हे वाचाच
3 आग लागण्याची भीती, BMW ने 16 लाख कार परत मागवल्या
Just Now!
X