News Flash

जिओच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर मिळेल २५९९ रुपयांची कॅशबॅक

ग्राहकांसाठी अनोखी संधी 

मागच्या काही दिवसांमध्ये रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये जणू एकप्रकारची स्पर्धा सुरु झाली आहे. जिओनेही आपल्या युजर्ससाठी काही खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. रिलायन्स जिओने स्वस्त प्लान्स बाजारात आणल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनीही या स्पर्धेत उतरल्या. ग्राहकांना स्वस्तात स्वस्त प्लान देण्याची जणू या कंपन्यांमध्ये स्पर्धाच लागलीये.

जिओने नोव्हेंबरमध्ये आपल्या युजर्ससाठी खास कॅशबॅक ऑफर आणली होती. या ऑफरची अखेरची तारीख सुरुवातीला २५ नोव्हेंबर अशी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता याची मुदत वाढवून ही तारीख २५ डिसेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना २५ डिसेंबरपर्यंत या अनोख्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर कंपनीने ३९९ आणि त्याहून अधिक रुपयांच्या रिचार्जवर दिली असून यामध्ये ग्राहकांना जवळपास २५९९ रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. मात्र ही ऑफर विशिष्ट रिचार्ज केल्यावरच मिळणार आहे.

जर तुम्ही जिओचे ३९९ रुपयांचे रिचार्ज केलं तर यावर तुम्हाला ४०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. १८९९ रुपयांचे ऑनलाइन शॉपिंग व्हाऊचर आणि ३०० रुपये मोबाईल वॉलेटमध्ये आणि बाकी उरलेल्या पैशांचे शॉपिंग वाऊचर मिळणार आहेत. नव्या आणि जुन्या युजर्ससाटी मोबिक्विकवर ही ऑफर मिळू शकेल. मोबिक्विकद्वारे नव्या युजर्सनी ३९९ रुपयांचे रिचार्ज करताना NEWJIO कोड टाकल्यास ३०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. तर जुन्या युजर्सना JIO149 हा कोड टाकावा लागेल. जुन्या युजर्सना १४९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. अॅमेझॉन-पे वरुन ३९९ रुपयांच्या रिचार्जवर नव्या युजर्सना ९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि जुन्या युजर्सना २० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. पेटीएमद्वारे जिओचे ३९९ रुपयांचे रिचार्ज करताना नव्या युजर्सनी NEWJIO हा कोड टाकल्यास ५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय जुन्या युजर्सनी PAYTMJIO कोड टाकल्यास १५ रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:46 pm

Web Title: jio exciting plan of cashback you will get 2599 rs on recharge of 399
Next Stories
1 आनंदी राहण्यासाठी खास टिप्स
2 विविध रोगांविरोधात लसूण उपयुक्त
3 तुमचंही काजळ पसरतंय? ‘हे’ करुन पाहा
Just Now!
X