रिलायंस जिओकडून Jio Fiber ब्रॉडबँड सर्व्हिसच्या विद्यमान ग्राहकांना एक मोफत सेट-टॉप बॉक्स मिळणार आहे. याशिवाय कंपनीकडून नवीन ग्राहकांनाही सेट-टॉप बॉक्सची ऑफर दिली जात आहे. कारण, रिलायन्स जिओने प्रिव्ह्यू ऑफरच्या ग्राहकांना आता पेड प्लानमध्ये वर्ग करणं सुरू केलं आहे.

कंपनीच्या ब्रॉडबँड सेवेचा लाभ घेणाऱ्या विद्यमान आणि नव्या ग्राहकांसाठीही जिओ फायबर सेट टॉप बॉक्स उपलब्ध आहे. जर तुम्ही नवे ग्राहक असाल तर सेट-टॉप बॉक्स तुमच्या घरी सामान्य इंस्टॉलेशन प्रक्रियेनुसार इंस्टॉल केला जाईल. सेट-टॉप बॉक्स इंस्टॉलेशनसाठी रिलायन्स जिओकडून एक टेक्निशियन घरी पाठवला जाईल. तुमच्या MyJio app मधून व्हाऊचर क्लेम करावं लागेल. सेटअप पूर्ण झाल्यानंतर सेट-टॉप बॉक्स टीव्हीशी जोडला जाईल. पहिल्यांदाच कनेक्ट करतानाही काही अपडेट्स इंस्टॉल होतील, तसंच रिमोट कंट्रोललाही नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळेल. प्रिव्ह्यू ऑफरच्या ग्राहकांना मोफत सेट-टॉप बॉक्ससाठी काही प्रक्रिया करावी लागणार आहे. यानुसार, MyJio app द्वारे तुमच्या आवडीचा पेड प्लान निवडण्यासाठी साइन-अप करा. त्यानंतर एक महिना , तीन महिने आणि वर्षभरासाठीचा प्लॅन निवडण्याचा पर्याय मिळेल. बिलाचा भरणा केल्यानंतर MyJio app च्या स्क्रीनवर एक बॅनर दिसेल, त्यावर तुम्हाला सेट-टॉप बॉक्स इंस्टॉल करण्यासाठीची वेळ घ्यावी लागेल. याशिवाय रिलायन्स जिओ स्टोअरमधूनही तुम्ही मोफत सेट-टॉप बॉक्स घेऊ शकता.

जिओ फायबर सेट-टॉप बॉक्स :
अँड्रॉईड 7.0 वर आधारित असलेल्या या सेट-टॉप बॉक्सद्वारे सध्या काही Apps आणि इतर सेवांचं प्रक्षेपण केलं जातं. काही निवडक गेम्स डाउनलोड करुन देखील यावर खेळता येतील. याचा वापर फक्त इंटरनेटद्वारे प्रक्षेपणासाठीच केला जाऊ शकतो. म्हणजेच यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन गरजेचं आहे.