News Flash

जिओच्या ३९८ रुपयांच्या रिचार्जवर मिळणार ७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीने अगदी कमी कालावधीत भारतात आपले स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा एकाहून एक उत्तम ऑफर्स देत जिओने ग्राहकांची पसंती मिळवलीच पण त्यानंतर आकर्षक कॅशबॅक ऑफर्स देत जिओने त्यांना अधिकच खूश केले आहे. जिओने नुकतीच आपली आणखी एक ऑफर जाहीर केली असून ३९८ च्या रुचार्जवर ग्राहकांना ७०० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ऑनलाइन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ही ऑफर मिळणार असून ती ३१ जानेवारीपर्यंत उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे. तुम्ही ३९८ रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज केले तर तुमच्या वॉलेटमध्ये ३०० रुपये येतील. याशिवाय जिओच्या अॅपमध्ये ५० रुपयांचे ८ व्हाऊचर मिळतील. त्यामुळे पुन्हा रिचार्ज करायचे असल्यास ग्राहकांना हे व्हाऊचर वापरता येतील. याशिवाय अँमेझॉन पे, फोन पे, फ्रिचार्ज आणि पेटीएमसारख्या इतर वॉलेटमधून रिचार्ज केल्यावर आकर्षक ऑफर्स देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

अॅमेझॉन पे वर ५० रुपयांची कॅशबॅक मिळेल. मोबिक्विकवरुन रिचार्ज केल्यावर jiogift चा कोड टाकून तुम्हाला ३०० रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. पेटीएमव्दारे रिचार्ज केल्यावर न्यू जिओचा कोड टाकल्यानंतर ५० रुपयांची तर पे-टीएम जिओ कोड टाकल्यानंतर ३० रुपयांची कॅशबॅक मिळेल. अॅक्सिस पेव्दारे रिचार्ज केल्यावर युजर्सना १०० रुपयांची कॅशबॅक मिळेल. याबरोबरच फोन पेव्दारे रिचार्ज केल्यावरही नवीन युजर्सना १०० रुपये आणि जुन्या युजर्सना ३० रुपये कॅशबॅक ऑफर मिळू शकेल. ३९८ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना अनलिमिटेड डेटा दिला जात असून त्यात हाय स्पीडचा केवळ १.५ जीबी डेटा दिला जात आहे. याबरोबरच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० मोफत मेसेज देण्यात येत आहेत.

याआधी जिओने ३९९ रुपयाचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना तब्बल २५९९ आणि ३३०० रुपयांची कॅशबॅक दिली होती. त्यानंतर आता ही अनोखी ऑफर जिओच्या ग्राहकांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. सातत्याने नवनवीन प्लॅन्स जाहीर करत ग्राहकांना खूश करणाऱ्या जिओला ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळत असून त्यामुळे स्पर्धक कंपन्याही विविध ऑफर्स जाहीर करत असल्याचे दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 2:34 pm

Web Title: jio is giving 700 cashback on recharge of rs 398
Next Stories
1 पतंजलीची उत्पादने आता एका क्लिकवर!
2 अॅमेझॉनमध्ये ‘या’ आहेत नोकरीच्या अनोख्या संधी
3 सरळ उभे राहिला नाहीत तर शरीराचा समतोल बिघडेल
Just Now!
X