टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवीन डेटा प्लॅन आणला आहे. या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी Disney+ Hotsar VIP चं सबस्क्रिप्शन मोफत दिलं जात आहे.

जिओच्या या डेटा पॅकची किंमत 222 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी Disney+ Hotsar VIP चं सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत मिळेल. याशिवाय एकूण 15GB डेटाही ग्राहकांना वापरण्यास मिळेल. या प्लॅनची वैधता तुमच्याकडे आधीपासून अ‍ॅक्टिव्ह असलेल्या प्लॅनऐवढी असेल.

वार्षिक प्लॅन असलेल्या ग्राहकांसाठी, ज्यांना Disney+ Hotsar VIP चं सबस्क्रिप्शन मिळालं नाही त्यांच्यासाठी कंपनीने हा प्लॅन आणला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने सर्व प्रीपेड युजर्सना चार प्लॅन्समध्ये (– 401 रुपयांचा प्लॅन, 2,599 रुपयांचा प्लॅन, 612 रुपयांचे डेटा व्हाउचर आणि 1208 रुपयांचे डेटा व्हाउचर) Disney+ Hotsar VIP चं फ्री सबस्क्रिप्शन देण्यास सुरूवात केली होती. पण आधीपासून वार्षिक प्लॅन असलेल्या ग्राहकांना या सेवेचा लाभ मिळत नव्हता. त्यांच्यासाठी कंपनीने हा २२२ रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे.