News Flash

Jio चं पुढचं पाऊल! आता जगभरातील Android टीव्हींसाठी जिओ ब्राऊजर उपलब्ध!

जिओनं जगभरातल्या अँड्रॉईड टीव्ही युजर्ससाठी नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे.

इंटरनेटच्या जगतामध्ये आपल्या अल्प दरातील प्लॅन्समुळे उलथापालथ घडवून आणणाऱ्या Jioनं आता जगभरातल्या ग्राहकांसाठी अजून एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. आत्तापर्यंत JioPages हा फक्त जिओ सेट टॉप बॉक्सवरच उपलब्ध असलेला ब्राऊजर आता जगभरातल्या Android टीव्ही युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पूर्णपणे टीव्हीसाठी बनवण्यात आलेल्या या ब्राऊजरमुळे अँड्रॉइड युजर्सला थेट टीव्हीवर वेब ब्राऊजिंग करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवरून JioPages युजर्सला थेट आपल्या टीव्हीवर डाऊनलोड करता येणार आहे.

जिओचा हा ब्राऊजर याआधी सेट टॉप बॉक्ससोबतच अँड्रॉइड मोबाईल युजर्ससाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होता. २०१८ पासून मोबाईल युजर्सला तो डाऊनलोड करता येत होता. अवघ्या २५ महिन्यांमध्ये १ कोटींहून जास्त डाऊनलोड झाल्यानंतर आता त्याचं पुढचं व्हर्जन अँड्रॉइड टीव्ही युजर्ससाठी जीओनं आणलं आहे.

Reliance Jio : 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ऑफर्स

टीव्हीसाठीचा भारतातील पहिला ब्राऊजर!

दरम्यान, हा फक्त टीव्हीसाठी तयार करण्यात आलेला पहिला भारतीय ब्राऊजर असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे. यामध्ये वेगवान वेब सर्फिंग, इनकॉग्निटो मोड आणि तब्बल ८ भारतीय भाषांमध्ये वेब ब्राऊजिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 10:55 pm

Web Title: jio pages jio browser now available for android tv users worldwide pmw 88
Next Stories
1 OnePlus 6 भारतात लॉन्च : आजपासून विक्रीला सुरुवात, 256 GB स्टोरेजसह मिळणार 8 GB रॅम
2 रिलायन्स जिओची बुस्टर ऑफर; जादा डेटा, एसएमएस पॅक मिळणार
3 बहुचर्चित iPhone 7 चे फिचर्स!
Just Now!
X