रिलायन्स जिओच्या Jio Phone 2 साठी आज दुसरा फ्लॅशसेल आयोजित करण्यात आला आहे. जिओचं अधिकृत संकेतस्थळ Jio.com वर दुपारी 12 वाजेपासून हा सेल सुरू होत आहे. फोन बुक केल्यानंतर सात दिवसांमध्ये फोनची डिलीव्हरी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर केली जाईल. फोनच्या डिलीव्हरीसाठी कंपनीकडून 99 रुपये शिपींग चार्ज आकारला जाणार आहे. यापूर्वी कंपनीने 16 ऑगस्ट रोजी या फोनचा पहिला सेल आयोजित केला होता, त्यावेळी काही मिनिटांतच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला. त्यामुळे ग्राहकांची या फोनला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून 2 हजार 999 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवली आहे. फोनमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4जी फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी असून त्यामुळे 14 तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत. जिओ फोन मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जिओ युजर्स अवघ्या 501 रुपयांमध्ये त्यांचा जुना फोन बदलू शकणार आहे.

कसा खरेदी करायचा-
– सर्वप्रथम जिओच्या संकेतस्थळावर असलेल्या लाल रंगाच्या Flash Sale बटनावर टॅप करा
– त्यानंतर Buy Now वर क्लिक करा
– आता तुम्हाला ज्या परिसरात या फोनची डिलीव्हरी हवी असेल त्या ठिकाणाचा पिनकोड विचारला जाईल. जर संबंधित ठिकाणी फोनची       डिलिव्हरी होत असेल तर तुमची ऑर्डर कार्टमध्ये अॅडमध्ये केली जाईल, आणि तुमच्यासमोर नवं पेज सुरू होईल.
– या पेजवर तुम्हाला तुमची खासगी माहिती म्हणजेच तुमचं नाव, ईमेल आयडी आणि फोन नंबर विचारला जाईल.
– त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी फोनची डिलीव्हरी हवी असेल तेथील संपूर्ण पत्ता टाकावा लागेल.
– आता तुम्हाला पेमेंट करावं लागेल. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग आणि जिओ मनीसारखे पर्याय मिळतील. तुम्हाला  हवा तो पर्याय निवडून तुम्ही पेमेंट करु शकतात.